१० वर्षे लहान अभिनेत्याला डेट करतेय श्वेता तिवारी? अफेयरच्या चर्चेवर आता त्याने सोडलं मौन
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 4, 2024 15:24 IST2024-05-04T15:23:53+5:302024-05-04T15:24:19+5:30
Shweta Tiwari : टेलिव्हिजनवरील लोकप्रिय अभिनेत्री श्वेता तिवारी गेल्या काही दिवसांपासून डेटिंगच्या बातम्यांमुळे चर्चेत आहे. असे म्हटले जात आहे की ती तिच्यापेक्षा १० वर्षांनी लहान अभिनेत्याला डेट करते आहे. दरम्यान आता या वृत्तावर अभिनेत्यानेच मौन सोडले आहे.

१० वर्षे लहान अभिनेत्याला डेट करतेय श्वेता तिवारी? अफेयरच्या चर्चेवर आता त्याने सोडलं मौन
छोट्या पडद्यावरील प्रसिद्ध अभिनेत्री श्वेता तिवारी (Shweta Tiwari) तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत आली आहे. बऱ्याच कालावधीपासून चर्चा रंगली आहे की ती तिच्यापेक्षा १० वर्षांनी लहान असलेल्या एका अभिनेत्याला डेट करत आहे आणि हा अभिनेता दुसरा कोणी नसून 'इमली' मालिकेतील आर्यन सिंग राठौर म्हणजेच फहमान खान आहे.
गेल्या काही काळापासून श्वेता तिवारी आणि फहमन खानच्या अफेयरच्या वृत्तांनी ग्लॅमर विश्वात खळबळ उडवून दिली होती. आता अखेर फहमननेच या अफवांवर मौन सोडले आहे. या अभिनेत्याने श्वेतासोबतच्या अफेयरच्या चर्चांवर मौन सोडले आहे. फहमान खानने नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत श्वेता तिवारीसोबतच्या रिलेशनशीपचे वृत्त फेटाळून लावले आहे. फहमानने स्पष्ट सांगितले की, तो श्वेताला डेट करत नाहीये. डेटिंगच्या बातम्यांमुळे तो खूप संतापला होता.
ही निव्वळ अफवा - फहमान
टेली मसालाला दिलेल्या मुलाखतीत फहमान म्हणाला, " मी श्वेता तिवारीला डेट करत असल्याचे वृत्त निव्वळ अफवा आहे. आम्ही खूप हसलो. आम्ही विचार करत होतो, 'आम्ही काय वेडे झालो आहोत?'. मी पूर्णवेळ गुरु चेला करतो आहे आणि यांनी वेगळेच वळण दिले आहे. अचानक मला वाटू लागले की अखेर हे काय चालू आहे?
अफेयरच्या चर्चेवर श्वेता तिवारीची रिअॅक्शन
जेव्हा श्वेता तिवारीला त्याच्या डेटिंगच्या वृत्तांबद्दल सांगितले तेव्हा तिची प्रतिक्रिया काय होती हे देखील फहमान खानने सांगितले होते. अभिनेता म्हणाला, "मला वाटले, मी वेडा झालोय का? मला याचा इतका राग का आहे?" मग त्याने सांगितले की जेव्हा त्याने श्वेताला सांगितले तेव्हा ती पण खूप हसली होती.
श्वेता तिवारीची झालीत दोन लग्न
श्वेता तिवारीने आयुष्यात दोनदा लग्न केले आहे. १९९८ साली राजा चौधरीसोबत तिने लग्न केले. अभिनेत्रीला राजापासून एक मुलगी आहे, तिचे नाव पलक तिवारी आहे. पलकने सलमान खानच्या किसी का भाई किसी की जान या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. २०१३ मध्ये श्वेताने अभिनव कोहलीशी लग्न केले, त्या दोघांना एक मुलगा आहे. सध्या श्वेता तिच्या दोन्ही पतींपासून विभक्त झाली आहे.