पलक तिवारीच्या शॉर्ट ड्रेसमधील ग्लॅमरस व्हिडीओची होतेय चर्चा, अदांवर चाहते झाले फिदा!
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 4, 2021 17:24 IST2021-12-04T17:10:16+5:302021-12-04T17:24:31+5:30
पलक तिवारी बोल्ड स्टाईलमध्ये पोज देताना दिसतं आहे.

पलक तिवारीच्या शॉर्ट ड्रेसमधील ग्लॅमरस व्हिडीओची होतेय चर्चा, अदांवर चाहते झाले फिदा!
श्वेता तिवारीची मुलगी पलक तिवारी (Palak Tiwari) सोशल मीडियावर सध्या बरीच अॅक्टिव्ह असते. सोशल मीडियावर स्वतःचे फोटो आणि व्हिडिओसुद्धा शेअर करत असते. आपले ग्लॅमरस फोटो पलक शेअर करत असते. सोशल मीडियावर तिचे लाखो चाहते आहे. तिने नुकताच सोशल मीडियावर तिने एक व्हिडीओ पोस्ट केला आहे. पलकचा हा व्हिडीओ सध्या व्हायरल होतो आहे.
व्हिडिओमध्ये पलक तिवारी (Palak Tiwari) 'हिप्स डोंट लाइ' गाण्यावर पोज देताना दिसतं आहे. तिने खूप बोल्ड ड्रेस घातला आहे, पलक तिवारी बोल्ड स्टाईलमध्ये पोज देताना दिसतं आहे. हा व्हिडिओ तिने इंस्टाग्राम अकाउंटवर शेअर केला आहे. पलक तिवारीच्या या व्हिडिओला चाहत्यांची पसंती मिळते आहे. एका चाहत्याने लिहिले, तू खूप सुंदर आहेस. दुसर्याने लिहिले, हॉट. याशिवाय चाहते कमेंट सेक्शनमध्ये हार्ट आणि फायर इमोजी शेअर केले आहेत.
पलक तिवारीचं अलिकडेच 'बिजली बिजली' हा म्युझिक व्हिडीओ रिलीज झाला होता. त्याला खूप पसंती मिळते आहे. चाहत्यांशिवाय अनेक सेलिब्रिटींनीही या गाण्यावर डान्स करतानाचे त्यांचे व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केले आहेत. काही दिवसांपूर्वी पलकने आई श्वेतासोबत याच गाण्यावर धमाकेदार डान्स केला होता, ज्याचा व्हिडिओ इंटरनेटवर व्हायरल झाला होता.
पलकने रोजी द सॅफरन चॅप्टर सिनेमातून आपल्या करिअरला सुरूवात केली आहे. या सिनेमाचं दिग्दर्शन विशाल मिश्राने केलं आहे. यात अरबाज खान, मल्लिका शेरावत आणि विवेक ओबेरॉयही आहेत.