श्वेता तिवारीच्या या अदांवर चाहते झाले फिदा, म्हणाले - किसी दुल्हन से कम नहीं लग रही

By ऑनलाइन लोकमत | Published: December 28, 2021 03:52 PM2021-12-28T15:52:05+5:302021-12-28T15:56:38+5:30

टीव्ही इंडस्ट्रीची लोकप्रिय अभिनेत्री श्वेता तिवारी Shweta Tiwari) तिच्या अभिनयासोबतच फिटनेस आणि सौंदर्यासाठी ओळखली जाते.

Shweta tiwari look stunning in red saree wrote wedding ka season hai | श्वेता तिवारीच्या या अदांवर चाहते झाले फिदा, म्हणाले - किसी दुल्हन से कम नहीं लग रही

श्वेता तिवारीच्या या अदांवर चाहते झाले फिदा, म्हणाले - किसी दुल्हन से कम नहीं लग रही

googlenewsNext

टीव्ही इंडस्ट्रीची लोकप्रिय अभिनेत्री श्वेता तिवारी Shweta Tiwari) तिच्या अभिनयासोबतच फिटनेस आणि सौंदर्यासाठी ओळखली जाते. वेस्टर्न असो वा ट्रेडिशनल, कोणत्याही प्रकारच्या ड्रेसमध्ये ती सुंदरच दिसते. तिचा अलिकडचा लूक चाहत्यांना खूप आवडला आहे, ज्यामध्ये ती लाल रंगाच्या साडीमध्ये खूपच सुंदर दिसत आहे. त्याचे फोटो इंटरनेटवर व्हायरल होतायेत. 

खरं तर, श्वेता तिवारी तिची मुलगी पलक आणि मुलगा रेयांशसोबत लग्नाला गेली होती. या खास प्रसंगी तिने लाल रंगाची साडी परिधान केली होती. स्टोन वर्कचा डीप नेक ब्लाउज आणि जडाऊ नेकलेस आणि कानातले. न्यूड मेकअप आणि मोकळ्या केसांमध्ये श्वेता खूपच सुंदर दिसत आहे.

इंस्टाग्रामवर फोटो शेअर करत श्वेताने कॅप्शनमध्ये लिहिले की, 'लग्नाचा सीझन'. तिने मुलगा रेयांशसोबतचा एक फोटोही शेअर केला आहे. श्वेताची ही स्टाईल पाहून तिचे चाहते फिदा झाले आहेत. एकाने कमेंट केली – तुम्हीही नवरी पेक्षा कमी दिसत नाही.

पर्सनल लाईफमुळे असते चर्चेत 
श्वेता प्रोफेशनल लाईफ पेक्षा पर्सनल लाईफमुळे जास्त चर्चेत असते. 'खतरों के खिलाडी' या रिअॅलिटी शोमध्ये सहभागी झाली तेव्हा  अभिनव कोहलीने आपल्या मुलाला हॉटेलमध्ये सोडल्याचा आरोप केला होता. हा वाद इथेच थांबला नाही तर श्वेता आणि अभिनवमधील मतभेदाच्या बातम्या येत राहिल्या. कोणी आरोप केले तर कोणी स्पष्टीकरण देताना दिसले.'खतरों के खिलाडी' या शोमध्ये श्वेताने तिच्या फिटनेससाठीही चर्चेत आली होती. वयाच्या 41 व्या वर्षीही ती खूपच तरुण दिसते.

Web Title: Shweta tiwari look stunning in red saree wrote wedding ka season hai

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.