धक्कादायक, श्वेता तिवारीचा पती अभिनवचा लज्जास्पद प्रकार CCTV कैद, तिच्यासह मुलांचाही सुरु मानसिक छळ
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 11, 2021 11:53 IST2021-05-11T11:52:57+5:302021-05-11T11:53:37+5:30
श्वेता तिवारी आणि अभिनव कोहली यांच्यातील वाद संपण्याची चिन्ह दिसत नाहीयेत.गेल्या काही दिवसांपासून श्वेता आणि तिचा पती अभिनव कोहली यांच्यातला वाद जगासमोर आला आहे.

धक्कादायक, श्वेता तिवारीचा पती अभिनवचा लज्जास्पद प्रकार CCTV कैद, तिच्यासह मुलांचाही सुरु मानसिक छळ
श्वेता तिवारीने 2013 मध्ये अभिनव कोहलीसोबत दुसरे लग्न केले होते. 2019 मध्ये दोघे कायदेशीररित्या विभक्त झाले आहेत. श्वेता आणि अभिनव ब-याच काळापासून मुलगा रेयांशच्या कस्टडीसाठी दोघांमध्ये वाद सुरु आहेत. श्वेता तिवारी आणि अभिनव कोहली यांच्यातील वाद संपण्याची चिन्ह दिसत नाहीयेत.
गेल्या काही दिवसांपासून श्वेता आणि तिचा पती अभिनव कोहली यांच्यातला वाद जगासमोर आला आहे. सातत्याने दोघांच्या बातम्या येत आहेत. नुकताच आपल्या मुलाला मुंबईतील एका हॉटेलमध्ये ठेऊन 'खतरों के खिलाडी' या शोसाठी श्वेता केपटाऊनला निघून गेली, असा आरोप अभिनवने तिच्यावर केला होता.इतकेच नाहीतर कोरोना काळातही मुलाला असे एकटं सोडणं कितपत सुरक्षित आहे.
तुला फक्त पैसे कमवायचे आहेत. पैसा कमवणे इतके महत्त्वाचे होते तर मुलाला माझ्याकडे सोडून जायचे होते.अभिनवच्या आरोपांवर श्वेतानेदेखील तीव्र प्रतिक्रिया दिली.अभिनव मुलांच्या खर्चासाठी एक पैशाची मदत करत नाही.” असे आरोप श्वेताने केले होते. श्वेता तिवारीच्या या आरोपांनतर अभिनवने पुन्हा एकदा एक व्हिडिओ शेअर करत श्वेताने केलेला दावा खोटा असल्याचे म्हटले होते.
घटस्फोटोनंतर श्वेता आणि अभिनव यांचा मुलगा रेयांश श्वेताकडेच राहतो. अभिनवला मात्र मुलाने त्याच्याजवळ राहावे अशी इच्छा व्यक्त केली होती. पण अभिनव मुलाचा योग्य सांभाळ करु शकत नसल्याचे श्वेताने म्हटले आहे. मुलाची चिंता सध्या श्वेताला सतावत आहे. अधून मधून मुलाला भेटण्यासाठी अभिनव घरी येत जात असतो.
मात्र त्यावेळीही तो असा काय वागतो की त्याला भेटायला मुलगा घाबरतो असेही तिने सांगितले आहे. अभिनवने कशा प्रकारे तिच्या सोसायटीत येऊन गोंधळ घातला होता हे दाखवणारे सीसीटीव्ही फुटेजच सोशल मीडियावर शेअर केले आहेत. घडलेल्या या प्रकारामुळे मुलगा रेयांश इतका घाबरला होता की, तो रात्री झोपतानाही घाबरायचा असेही तिने म्हटले आहे.
अभिनवचे खरे रुप जगासमोर यावे म्हणून श्वेताने हा व्हिडीओ शेअर केला आहे. काही वेळानंतर हा व्हिडीओ डिलीट करणार असल्याचे तिने म्हटले आहे. फक्त सत्य काय आहे ही लोकांना समजावे यासाठी हा पुरावा शेअर करत असल्याचे तिने म्हटले आहे.