'घरात नवरा आणि बाहेर बॉयफ्रेंड असं असण्यापेक्षा...'; श्वेता तिवारीचं वक्तव्य चर्चेत
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 22, 2022 15:48 IST2022-03-22T15:47:50+5:302022-03-22T15:48:39+5:30
Shweta tiwari: सध्या सोशल मीडियावर श्वेताचा एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये तिने महिलांविषयी एक थक्क करणारं विधान केलं आहे.

'घरात नवरा आणि बाहेर बॉयफ्रेंड असं असण्यापेक्षा...'; श्वेता तिवारीचं वक्तव्य चर्चेत
स्पष्टवक्तेपणा आणि रोखठोक बोलण्याच्या शैलीमुळे कायम चर्चेत येणारी अभिनेत्री म्हणजे श्वेता तिवारी (Shweta Tiwari). उत्तम अभिनयामुळे चर्चेत असणारी श्वेता गेल्या काही दिवसांपासून तिच्या वैयक्तिक जीवनामुळे चर्चेत येत आहे. यात श्वेताचं लग्न, घटस्फोट यांसारख्या अनेक गोष्टी चर्चेत राहिल्या. यामध्येच अलिकडे श्वेताने एक वक्तव्य केलं आहे ज्यामुळे ती चर्चेत आली आहे.
सध्या सोशल मीडियावर श्वेताचा एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये तिने महिलांविषयी एक थक्क करणारं विधान केलं आहे. ज्यामुळे सगळ्यांचं लक्ष तिच्याकडे वेधलं आहे. अलिकडेच श्वेताला तिच्या पर्सनल लाइफविषयी काही प्रश्न विचारण्यात आले. या प्रश्नांची उत्तरं देताना तिने हे वक्तव्य केलं आहे. यात पतीची फसवणूक करणाऱ्या स्त्रीविषयी आणि पत्नीची फसवणूक करणाऱ्या पुरुषांविषयी तिने थेट वक्तव्य केलं आहे.
काय म्हणाली श्वेता?
"समाजात वेगवेगळ्या विचारांची, स्वभावाची माणसं पाहायला मिळतात. इथे असेही लोक आहे ज्यांची घरी पत्नी आहे. मात्र, तरीदेखील त्याची बाहेर गर्लफ्रेंड आहे. तसंच यात अशाही काही स्त्रिया असतील ज्यांचा नवरा असूनही एक बॉयफ्रेंड आहे. जर हे असं असेल तर या सगळ्यांपेक्षा मी चांगली आहे ना. जे काही करते ते जाहीरपणे करते. निदान लपवालपवी किंवा खोटं बोलून तर करत नाही", असं श्वेता म्हणाली.
पुढे ती म्हणते, "मी एका नात्यातून बाहेर पडले आणि मगच दुसऱ्या नात्याचा विचार केला. मी लोकांचा विचार करत नाही. मला जे योग्य वाटतं मी तेच करते. त्यामुळे ज्या स्त्रिया नव्याने आयुष्य सुरु करण्यापूर्वी घाबरतात, लोक काय बोलतील याचा विचार करतात त्या स्त्रियांसाठी मला एक स्टँड घ्यायला नक्कीच आवडेल. त्यांचे विचार बदलायला मला आवडतील."
दरम्यान, श्वेताने राजा चौधरीसोबत पहिलं लग्न केलं होतं. मात्र, ९ वर्षानंतर ही जोडी कायदेशीररित्या विभक्त झाली. त्यानंतर एका मालिकेदरम्यान, श्वेता आणि अभिनव कोहलीची भेट झाली. यावेळी जवळपास २ वर्ष एकमेकांना डेट केल्यानंतर त्यांनी लग्न केलं.