वडिलांचं छत्र हरपलं, उपाशीपोटी दिवस काढले अन्, एका रात्रीत पालटलं सलमान खानच्या सिनेमातील अभिनेत्याचं नशीब

By ऑनलाइन लोकमत | Published: September 13, 2023 12:09 PM2023-09-13T12:09:18+5:302023-09-13T12:12:09+5:30

अभिनेत्याचं बालपण हालाखीच्या परिस्थिती गेलं. पैशाची चणचण होती तो अनेकवेळा उपाशी पोटी झोपायचा.

Siddharth nigam birthday special actor struggle career serials films dhoom 3 aamir khan kisi ka bhai kisi ki jaan salman khan unknown facts | वडिलांचं छत्र हरपलं, उपाशीपोटी दिवस काढले अन्, एका रात्रीत पालटलं सलमान खानच्या सिनेमातील अभिनेत्याचं नशीब

वडिलांचं छत्र हरपलं, उपाशीपोटी दिवस काढले अन्, एका रात्रीत पालटलं सलमान खानच्या सिनेमातील अभिनेत्याचं नशीब

googlenewsNext

लहरों से डरकर नौका पार नहीं होती, कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती या कवितेच्या ओळी अभिनेता सिद्धार्थ निगमला लागू होता. टीव्हीवरून बॉलिवूडच्या दुनियेत ठसा उमटवणाऱ्या सिद्धार्थ निगमचे आयुष्य चढ-उतारांनी भरलेले होते, पण त्यांनी कधीही हार मानली नाही. 13 सप्टेंबर 2000 रोजी उत्तरप्रदेशमध्ये जन्मलेल्या सिद्धार्थ निगमला आज कोणत्याच परिचयाची गरज नाही. युथ आयकॉन असलेल्या  सिद्धार्थ निगमच्या वाढदिवसाच्या दिवशी जाणून घेऊया त्याच्याबाबत काही खास गोष्टी. 

सिद्धार्थ निगमचे टीव्ही शो आणि चित्रपट
सिद्धार्थ निगम हा छोट्या पडद्यावरील प्रसिद्ध बालकलाकार आहे, त्याने 'चक्रवर्ती अशोक सम्राट', 'चंद्रनंदिनी' आणि 'अलाद्दीन - नाम तो सुना होगा' सारख्या टीव्ही शोमध्ये काम केले आहे. सिद्धार्थने 'धूम 3' चित्रपटात आमिर खानच्या बालपणीची भूमिकाही साकारली आहे. सिद्धार्थने 'धूम 3' मधून अभिनय क्षेत्रात पदार्पण केले आणि तो रातोरात स्टार बनला. त्यानंतर तो टीव्हीकडे वळला.  पण त्यांचे बालपण संघर्षमय होते.

एकदा सिद्धार्थ निगमने बॉलिवूड बबलला दिलेल्या मुलाखतीत सांगितले होते की त्याचं बालपण हालाखीच्या परिस्थिती गेलं. पैशाची चणचण होती तो अनेकवेळा उपाशी पोटी झोपायचा.  सिद्धार्थ म्हणाला, “मी खूप लहान असताना माझे वडील गेले. आमच्याकडे सर्व काही होते, पण वडील गेल्यानंतर आमच्यासाठी सर्व काही संपले. छोट्या गावात सगळं काही वडिलांच्या हातात असतं. अशा परिस्थितीत त्याच्या जाण्याने सर्व काही संपले होते, पण माझी आई खूप खंबीर स्त्री आहे.

आर्थिक चणचण
सिद्धार्थ पुढे म्हणाला होता, “माझी आई माझ्यासाठी देव आहे. मी खूप खोडकर होता, पण माझ्या वडिलांच्या मृत्यूनंतर सर्व काही बदलले. अलाहाबादला आलो तेव्हा आमच्याकडे काहीच नव्हते. मी चांगला विद्यार्थी नव्हतो. माझी काहीच स्वप्न नव्हते. वडील गेल्यानंतर सगळा भार आईवर पडला आणि ते खूप कठीण झाले. आमच्याकडे पैसे नसल्यामुळे आम्ही कधीकधी जेवत ही नव्हतो. सिद्धार्थने सांगितले की तो खेळात निपुण होता आणि त्याने जिम्नॅस्टिकला सुरुवात केली. तो 8 वर्षे वसतिगृहात राहिला.


सिद्धार्थ निगम सलमान खानच्या 'किसी का भाई किसी की जान' चित्रपटात झळकला आहे. या चित्रपटात सलमान खान, पूजा हेगडे, शहनाज गिल आणि पलक तिवारी यांच्याही भूमिका होत्या.

Web Title: Siddharth nigam birthday special actor struggle career serials films dhoom 3 aamir khan kisi ka bhai kisi ki jaan salman khan unknown facts

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.