आत्याबाई उडवणार सिध्दी- शिवाच्या लग्नाचा बार !

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 1, 2019 13:13 IST2019-05-01T13:13:01+5:302019-05-01T13:13:43+5:30

जीव झाला येडापिसा मालिकेच्या कथेची मांडणी, चित्रीकरण, मालिकेतील पात्र, रिअल लोकेशन्स यामुळे जीव झाला येडापिसा ही मालिका प्रेक्षकांना अल्पावधीतच आपलीशी आणि वास्तवादी वाटते आहे.

Siddhi-Shiva marriage in Jeev Jhala Yedapisa | आत्याबाई उडवणार सिध्दी- शिवाच्या लग्नाचा बार !

आत्याबाई उडवणार सिध्दी- शिवाच्या लग्नाचा बार !


लग्न म्हणजे जन्मभराचे ऋणानुबंध... ज्या व्यक्तीचा आपण दु:स्वास करतो त्याच्याबरोबर जेव्हा आयुष्याची गाठ बांधली जाईल तेव्हा काय होईल ? जीव झाला येडापिसा मालिकेमध्ये देखील असेच काहीसे घडणार आहे... मालिका आता एका रंजक वळणावर येऊन पोहचली आहे, ज्यामुळे शिवा आणि सिद्धीच्या आयुष्याला वेगळी कलाटणी मिळणार आहे.

आत्याबाई त्यांचं राजकीय स्थान वाचविण्यासाठी सिद्धी आणि शिवाचे लग्न शाही पद्धतीने लावून देणार अशी घोषणा गावामध्ये करतात. परंतु, शिवा आणि सिद्धीची ओळखच गैरसमजातून होते आणि हे गैरसमज दिवसेंदिवस वाढत जातात. शिवाबाबतीत असे अनेक प्रसंग घडतात ज्यामुळे सिद्धी शिवाचा तिरस्कार करू लागते. यामुळेच सिद्धीचा या लग्नास नकार असतो पण परिस्थितीनरूप सिद्धी शिवाशी लग्न करण्यास मंजुरी देते. आता आत्याबाईंनी घातलेला लग्नाचा घाट निर्विघ्नपणे पार पडेल ?  शिवा – सिद्धीचे लग्न हा आत्याबाईचा सगळ्यात मोठा डाव आहे हे शिवाला कळेल ? हे जाणून घेण्यासाठी शिवा-सिद्धीचा शाही विवाह सोहळा “जीव झाला येडापिसा” मालिकेमध्ये ६ मे रोजी रात्री ८.०० आपल्या कलर्स मराठीवर पहावा लागेल.

जीव झाला येडापिसा मालिकेच्या कथेची मांडणी, चित्रीकरण, मालिकेतील पात्र, रिअल लोकेशन्स यामुळे जीव झाला येडापिसा ही मालिका प्रेक्षकांना अल्पावधीतच आपलीशी आणि वास्तवादी वाटते आहे. चिन्मयी सुमित साकारत असलेले आत्याबाईचे पात्र, शिवाच्या वडिलांची भूमिका साकारणारे मोहन जोशी, आणि मालिकेतील इतर पात्र ते साकारत असलेल्या भूमिका अप्रतिमरित्या पार पाडत आहेत. गावातील रांगडा गडी शिवा म्हणजेच अशोक फळदेसाई आणि सिद्धीचे पात्र साकारणारी विदुला चौघुले यांनी आपल्या पहिल्याच मालिकेतून प्रेक्षकांची मने जिंकली आहेत. आता मालिकेमध्ये शिवा आणि सिद्धीच्या लग्नामुळे पुढे काय घडेल ?  कुठलं नवं वळण मालिकेला मिळेल ? हे बघणे रंजक असणार आहे.
शिवा – सिद्धीचा शाही विवाह सोहळा “जीव झाला येडापिसा” मालिकेमध्ये ६ मे रोजी रात्री ८.आपल्या कलर्स मराठीवर पाहता येईल.

Web Title: Siddhi-Shiva marriage in Jeev Jhala Yedapisa

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.