गायक झाला डान्सर! साडी नेसून 'चंद्रा' गाण्यावर अभिजीतच्या मनमोहक अदा, सर्वांकडून टाळ्या-शिट्ट्या

By ऑनलाइन लोकमत | Published: September 20, 2024 04:43 PM2024-09-20T16:43:10+5:302024-09-20T16:43:37+5:30

अभिजीत सावंतने चंद्रा गाण्यावर भन्नाट डान्स करुन घरातील सर्वांची चांगलीच वाहवा मिळवलीय (abhijeet sawant, bigg boss marathi 5)

singer abhijeet sawant dance in chandra song from chandramukhi film bigg boss marathi 5 | गायक झाला डान्सर! साडी नेसून 'चंद्रा' गाण्यावर अभिजीतच्या मनमोहक अदा, सर्वांकडून टाळ्या-शिट्ट्या

गायक झाला डान्सर! साडी नेसून 'चंद्रा' गाण्यावर अभिजीतच्या मनमोहक अदा, सर्वांकडून टाळ्या-शिट्ट्या

बिग बॉस मराठीच्या नवीन सीझनमध्ये सध्या एकापेक्षा एक टास्क आणि राडे बघायला मिळत आहेत. बिग बॉस मराठीच्या घरात आज कॅप्टनसी टास्क पाहायला मिळणार आहे. या टास्कनंतर घरात खेळीमेळीचं वातावरण दिसतंय. अशातच बिग बॉस मराठीच्या नवीन सीझनमध्ये आज जे कधीही नाही दिसलं ते पाहायला मिळणार आहे. घरात सहभागी असलेला इंडियन आयडॉल विजेता गायक अभिजीत सावंत आज चक्क साडी नेसून त्यावर डान्स करणार आहे.

अभिजीतचा चंद्रावर गाण्यावर भन्नाट डान्स

बिग बॉस मराठीच्या नवीन प्रोमोमध्ये पाहायला मिळतं की, जान्हवी बिग बॉसला विनंती करताना दिसते की, "पुढच्या वेळेला अभिजीतला लावणी करायला लावा." हे ऐकताच बिग बॉस म्हणतात, "पुढच्या वेळेला कशाला.." असं म्हणत बिग बॉस तातडीने घरात चंद्रा गाणं वाजवतात. गाणं लागताच नेसलेली साडी सांभाळत अभिजीत मनमोहक अदा करत 'चंद्रा' गाण्यावर भन्नाट डान्स करतो. अभिजीतच्या या डान्सला टाळ्या आणि शिट्ट्या मारत सर्वजण वाहवा म्हणतात.


आज होणार घराचा नवीन कॅप्टन

कोकिळेकडून येणारं अंडं इतरांच्या घरात ठेवल्याने काल कार्याअंती आज कॅप्टनसी टास्कसाठी चार उमेदवार आहेत. वर्षा उसगांवकर, सूरज चव्हाण, धनंजय पोवार आणि अरबाज पटेल हे चौघे कॅप्टनसीपदाचे उमेदवार आहेत. या चौघांपैकी कोण कॅप्टन होणार याकडे सर्वांचं लक्ष आहे. धनंजय आणि अरबाज या दोघांमध्ये कॅप्टनपदाची तगडी टक्कर रंगणार असल्याचं दिसतंय. धनंजय आतापर्यंत कधीच कॅप्टन झाला नसल्याने तो आज जीव तोडून खेळेल, यात शंका नाही.

Web Title: singer abhijeet sawant dance in chandra song from chandramukhi film bigg boss marathi 5

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.