"तुम सब उसको डरा सकते हो लेकिन..."; सूरज चव्हाणबाबत उत्कर्ष शिंदे एकाच वाक्यात खूप काही सांगून गेला

By ऑनलाइन लोकमत | Published: August 1, 2024 01:32 PM2024-08-01T13:32:33+5:302024-08-01T13:33:29+5:30

उत्कर्ष शिंदेने सूरज चव्हाणला सपोर्ट करताना खास वाक्य वापरलं आहे (bigg boss marathi 5)

singer utkarsh shinde support suraj chavan in bigg boss marathi 5 guligat dhoka | "तुम सब उसको डरा सकते हो लेकिन..."; सूरज चव्हाणबाबत उत्कर्ष शिंदे एकाच वाक्यात खूप काही सांगून गेला

"तुम सब उसको डरा सकते हो लेकिन..."; सूरज चव्हाणबाबत उत्कर्ष शिंदे एकाच वाक्यात खूप काही सांगून गेला

सध्या बिग बॉस मराठीच्या नवीन सीझनची चांगलीच चर्चा आहे. या नव्या सीझनमध्ये एकापेक्षा एक सोशल मीडिया स्टार सहभागी आहेत. यापैकी जास्त चर्चा आहे ती म्हणजे सूरज चव्हाणची. 'गुलीगत धोका' या डायलॉगने महाराष्ट्रात फेमस झालेला सूरज बिग बॉस मराठीच्या नवीन सीझनमध्ये सहभागी झालाय. सूरज घरात काहीसा एकटा पडल्यासारखा शांत शांत वाटतोय. पण नुकताच बिग बॉसने एक प्रोमो पोस्ट केलाय. यात बिग बॉसने सांगितल्यावर सूरज वेगळ्याच आवेशात घरात त्याचं अस्तित्व दाखवतोय. सूरजचं हे बदललेलं रुप पाहून उत्कर्ष शिंदेने त्याच्यासाठी एका वाक्यात खास पोस्ट केली आहे.

सूरज चव्हाणला उत्कर्ष शिंदेचा फुल्ल सपोर्ट

नुकताच कलर्स मराठीने सूरज चव्हाणशी संबंधित खास प्रोमो पोस्ट केला. या प्रोमोमध्ये सूरज निक्की तांबोळीला चॅलेंज करताना दिसून येत आहे. त्यानंतर कन्फेशन रुममध्ये 'बिग बॉस' सूरजला म्हणतात,"सूरज न घाबरता खेळा". सूरज बिग बॉसशी बोलून बाहेर आल्यावर अत्यंत आत्मविश्वासपूर्ण दिसतो. या प्रोमोखाली उत्कर्षने कमेंट केलीय की, "तुम सब उसको डरा सकते हो - हरा नहीं सकते .. #surajभीड" अशाप्रकारे एका वाक्यात उत्कर्षने सूरजला सपोर्ट केलेला दिसतोय. 


शांत असणाऱ्या सूरजचा नवा अवतार बघायला मिळणार?

सूरज चव्हाणचा हा प्रोमो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. "तू लढ भावा, ज्यांनी केला सूरजचा नाद त्यांना तो करणार गोलीगत बाद," "आपला भाऊ गोलीगत, नड तू," अशा कमेंट्स करत सूरजचे चाहते आणि नेटकरी त्याला चांगलच सपोर्ट करताना दिसत आहेत. गोलीगतची नवी स्टाईल नक्की कशी असेल, नव्या खेळीने तो नक्की काय करणार हे जाणून घेण्याची चाहत्यांना आता उत्सुकता लागली आहे. 
 

Web Title: singer utkarsh shinde support suraj chavan in bigg boss marathi 5 guligat dhoka

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.