भाभीजी घर पर है या मालिकेची टीम या कारणासाठी गेली गोव्यात

By ऑनलाइन लोकमत | Published: March 2, 2018 06:14 AM2018-03-02T06:14:29+5:302018-03-02T11:44:29+5:30

भाभीजी घर पर है ही मालिका प्रेक्षकांनी डोक्यावर घेतली आहे. या मालिकेतील अंगुरी भाभी तर प्रेक्षकांना प्रचंड आवडते. या ...

Sister-in-law is at home, the team of this series went to Goa for this purpose | भाभीजी घर पर है या मालिकेची टीम या कारणासाठी गेली गोव्यात

भाभीजी घर पर है या मालिकेची टीम या कारणासाठी गेली गोव्यात

googlenewsNext
भीजी घर पर है ही मालिका प्रेक्षकांनी डोक्यावर घेतली आहे. या मालिकेतील अंगुरी भाभी तर प्रेक्षकांना प्रचंड आवडते. या मालिकेत ही व्यक्तिरेखा शिल्पा शिंदे साकारत होती. पण या मालिकेचे निर्माते आणि शिल्पा यांच्यात झालेल्या वादामुळे शिल्पा या मालिकेतून बाहेर पडली. सध्या या मालिकेत अंगुरी भाभीच्या व्यक्तिरेखेत प्रेक्षकांना शुभांगी अत्रेला पाहायला मिळत आहे. शुभांगीची ही भूमिका प्रेक्षकांना चांगलीच आवडत आहे. प्रेक्षकांनी तिला या भूमिकेत स्वीकारले असल्याने ती चांगलीच खूश आहे. या मालिकेचे चित्रीकरण नेहमीच एखाद्या सेटवर केले जाते. 
भाभीजी घर पर है या मालिकेची कथा कानपूरची असल्याचे दाखवण्यात आले आहे. पण आता आता या मालिकेतील सगळी मंडळी गोव्याला फिरायला जाणार आहेत. अंगुरी-तिवारी,अनिता-विभुती या जोडप्यांसोबतच हप्पू, सक्सेना, टीका, मालखन आणि टिल्लू अशी सगळी गँगच गोव्याच्या सुंदर समुद्रकिनाऱ्यांवर धमाल मस्ती करताना दिसणार आहे. 'भाभीजी घर पर है'ची टीम गोव्याच्या निसर्गाचा आस्वाद घेत असताना त्यांच्या रोलर कोस्टर अनुभवांमुळे प्रेक्षकांना खळखळून हसायला मिळणार यात काहीच शंका नाही. 
भाभीजी घर पर है या मालिकेचे चित्रीकरण सध्या गोव्यातील सुंदर चर्चेस, किल्ले आणि समुद्रकिनाऱ्यांवर सुरू आहे. या मालिकेच्या टीमसाठी हा खूपच चांगला आणि वेगळा अनुभव आहे. याविषयी अंगुरी भाभीची भूमिका साकारणारी शुभांगी अत्रे सांगते, "मी याआधीही मित्रमंडळी आणि कुटुंबासोबत अनेकवेळा गोव्याला गेले आहे. पण इतकी धमाल मस्ती मी कधीच केली नव्हती. आम्ही सतत चित्रीकरण करतोय. त्याने खरे तर आम्ही प्रचंड थकतो. पण त्यातही गोव्याचा उत्साह एका नव्या पद्धतीने अुनभवत आहे. चित्रीकरणासोबत गोव्यात फिरायला देखील मिळावे म्हणून निर्मात्यांनी मालिकेचे चित्रीकरणाचे टाईमटेबल खूपच चांगल्याप्रकारे आखले आहे."
मनमोहन तिवारीची भूमिका साकारणारा रोहिताश गौर सांगतो, "गोव्याला जाऊन चित्रीकरण करणं हा आमच्यासाठी खूप चांगला अनुभव होता. भाभीजी घर पर है च्या आगामी भागांमध्ये सर्व व्यक्तिरेखांची एक वेगळी आणि धमाल विनोदी बाजू प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे." 

Web Title: Sister-in-law is at home, the team of this series went to Goa for this purpose

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.