माझ्या कारकिर्दीत ‘छोटा पडदा’ महत्त्वाचा ठरला- करण कुंद्रा !
By ऑनलाइन लोकमत | Published: June 23, 2018 06:05 PM2018-06-23T18:05:18+5:302018-06-23T18:05:18+5:30
-रवींद्र मोरे मुबारकॉँ, मेरे यार कमिने, हॉरर स्टोरी, 1921 आदी हिंदी चित्रपट तसेच विविध मालिकांमधून आपल्या अभिनयाची चुणूक दाखविणारा ...
मुबारकॉँ, मेरे यार कमिने, हॉरर स्टोरी, 1921 आदी हिंदी चित्रपट तसेच विविध मालिकांमधून आपल्या अभिनयाची चुणूक दाखविणारा करण कुंद्रा दीर्घ काळानंतर एकता कपूरच्या ‘दिल ही तो है..!’ या मालिकेत सध्या काम करत आहे. या मालिकेत करण एका बिझनेसमॅनची भूमिका साकारत असून त्याच्या भूमिकेबाबत आणि आतापर्यंतच्या प्रवासाबाबत त्याच्याशी मारलेल्या मनसोक्त गप्पा...!
* तू दीर्घ काळानंतर या मालिकेद्वारे पुनरागमन करीत आहे, ही भूमिका कशी मिळाली?
- होय, नाटक मालिकेद्वारे दूरचित्रवाणीवर परत येण्याकडे मी अलीकडे फारसा उत्सुक नव्हतो. माझा एक शो पूर्ण झाल्यावर मी गोवातून परतत होतो तेव्हा मला या मालिकेसाठी एक कॉल आला. नंतर एकता मॅडमने मला समजावून सांगितलं की हा एक सामान्य दैनिक शो सारखा नाही. या मालिकेतील माझे पात्र दररोजच्या मालिकेतील इतर माणसांच्या तुलनेत खरा माणूस आहे. या माझ्या पात्रात एक डावी बाजू देखील आहे, ज्यामुळे ती भूमिका अधिक वास्तव बनली आहे आणि आम्ही प्रेक्षकांना त्यातून दृश्यात्मक आनंद देण्याची आशा करतो. माझ्या मते, आजपर्यंतचा हा सर्वात मोठा शो असेल. मी आतापर्यंत चित्रपट, कल्पनारम्य शो, रिअॅलिटी शोमध्ये काम केले आहे परंतु यासारख्या शोमध्ये परत येणे खरोखरच रोमांचक आहे.
* या मालिकेबद्दल आणि त्यातील पात्राबद्दल अधिक काय सांगू शकाल ?
* या मालिकेत मी ऋत्विक नून नावाचया एका बिझनेसमॅनची भूमिका साकारत असून एक सरळ माणूस आहे. या मी आपल्या वडिलांना आपला व्यवसाय वाढविण्यासाठी मदत केली आणि यशाची नवी उंची गाठली. यशापर्यंत पोहचण्यासाठी प्रत्येक समस्येवर माझ्याकडे उपाय आहे, विशेष म्हणजे जोपर्यंत काम पूर्ण होत नाही तोपर्यंत मी विश्रांती घेत नाही. पण दुसरीकडे, एक मोहक आणि उमदा माणूस मला दाखविण्यात आले आहे. स्त्रियांचे शोषण करणे आणि त्यांच्याकडून सुख मिळवणे अशीही भूमिका यात माझी दाखविण्यात आली आहे.
* आजकाल अनेक टीव्ही कलाकार मोठ्या स्क्रीनवर तर अनेक बॉलिवुड कलाकार लहान स्क्रीनवर जात आहेत. यावरुन टीव्ही तेवढेच महत्त्वाचे माध्यम तुला वाटते का?
- का नाही, मीच त्याचे एक सर्वोत्तम उदाहरण आहे. मी दूरदर्शनवर कल्पनारम्य शोज आणि रिअॅलिटी शोज केले आहेत तसेच चित्रपटही केले आहेत. मी मुबारकॉँ आणि 1921 सारख्या चित्रपटांचा एक महत्त्वाचा भाग होतो ज्यांनी पाकिस्तानमध्ये रेकॉर्ड मोडले. आमच्या दैनिक मालिका खूप लोकप्रिय आहेत. मी बॉलिवूडमध्ये ब्रेक मिळवू शकेन, कारण मी पूर्वी दूरदर्शनमध्ये काम केले आहे. मला वाटते दूरचित्रवाणी खूप मोठी आहे आणि माझ्या कारकिर्दीसाठी हे महत्वपूर्ण ठरले आहे आणि मी त्यावर मनापासून प्रेम करतो.
* आजच्या काळात कुटुंबाचे महत्त्व कमी होत आहे त्यासाठी कौटुंबिक कार्यक्रम आणणे आवश्यक आहे असे तुम्हाला का वाटते?
- मला वाटते की आजकाल सगळे बरेच व्यस्त असतात. जेव्हा आम्ही लहान होतो आणि कोणत्याही समस्या असल्या तर तेव्हा आम्ही आमच्या मोठ्या भावाकडे किंवा पालकांकडे जायचो, जे आज क्वचितच घडते. एक काळ होता जेव्हा एका कुटुंबाचे सार आणि एकत्र कुटुंब ७० व ८० च्या दशकातील चित्रपटांच्या माध्यमातून चित्रित करण्यात येत असे. मला असे वाटते की आमच्यासाठी ती कौटुंबिक मूल्ये पुन्हा स्थापित करण्यास सुरुवात करणे महत्त्वाचे आहे आणि मला खरोखरच असे वाटते की यामुळे मुले त्यांच्या कुटुंबापासून दूर राहणार नाहीत. सध्याच्या परिस्थितीमध्ये, कुटुंबे एकत्र जेवत नाहीत आणि क्वचितच सुट्टीसाठी एकत्र जातात. माझ्या मते, त्यांना त्यांच्या कुटुंबाची किंमत समजणे महत्वाचे आहे जे कोणत्याही अर्थाने मोजता येत नाही.
* सोशल मीडियामुळे कुटुंबातील श्रद्धा, नैतिक मूल्यं, प्रेम कुठेतरी नाहीसे होते आहे असं तुम्हाला वाटतं का?
- माझ्या मते कुटुंब आणि भिन्न सदस्यांमध्ये एक अंतर निर्माण होत आहे. तरुण मुले आणि मुली, त्यांच्या कार आणि मित्रांसोबत फोटो घेणे पसंत करतात परंतु त्यांच्या पालकांबरोबर किंवा भावंडांबरोबर नाही. केवळ मदर्स डे किंवा फादर्स डेसारख्या प्रसंगी त्यांच्या पालकांशी चित्रे पोस्ट करतात. कुठेतरी पाश्चिमात्य संस्कृती तरुणांच्या नैतिक मूल्यांवर परिणाम करित आहे आणि योग्य मार्गावर त्यांना परत मिळविणे आमच्यावर अवलंबून आहे. या मालिकेद्वारे यावरच प्रकाशझोत टाकण्यात आला आहे.