छोट्या पडद्यावर पाहायला मिळणार ‘सूरज हुआ मध्यम’ गाण्याची जादू

By ऑनलाइन लोकमत | Published: April 10, 2017 11:58 AM2017-04-10T11:58:46+5:302017-04-10T17:28:46+5:30

काही लोकप्रिय सिनेमे हे आपल्या स्मृतीत कायमच लक्षात राहतात. शाहरूख खान आणि काजोल यांची काही सुपरहिट गाणी नेहमीच आपल्या ...

The small screen will be seen on 'Suraj Hua Medium' singing magic | छोट्या पडद्यावर पाहायला मिळणार ‘सूरज हुआ मध्यम’ गाण्याची जादू

छोट्या पडद्यावर पाहायला मिळणार ‘सूरज हुआ मध्यम’ गाण्याची जादू

googlenewsNext
ही लोकप्रिय सिनेमे हे आपल्या स्मृतीत कायमच लक्षात राहतात. शाहरूख खान आणि काजोल यांची काही सुपरहिट गाणी नेहमीच आपल्या ओठांवर असतात.आजच्या पिढीतील चाहते आणि प्रेक्षकांसाठी त्या गीतांना पुन्हा एकदा उजाळा द्यायला काय हरकत आहे? बॉलिवूडचा आघाडीचा निर्माता-दिग्दर्शक करण जोहर याच्याबरोबर काम केलेले सिध्दार्थ मल्होत्रा आता ‘लव्ह का है इंतजार’ या आपल्या नव्या मालिकेच्या चित्रीकरणात व्यग्र झाला आहे. या मालिकेत नायक व नायिकेच्या भूमिकेत कीथ सीक्वेरा आणि संजिदा शेख हे कलाकार असून ते रोमँटिक वातावरण निर्माण करणार आहेत. या मालिकेसाठी गाण्याची निवड करताना सिध्दार्थ मल्होत्राने ‘कभी खुशी कभी गम’ या चित्रपटातील आपल्या पसंतीच्या गाण्याची निवड केली आहे. या गाण्याच्या चित्रीकरणासाठी त्यांनी वाळवंटाची पार्श्वभूमी निवडली असून या सिनेमातील ‘सूरज हुआ मध्यम चाँद जलने लगा’ या गाण्याचे संगीतकार संदेश शांडिल्य यांच्या जोडीने या गाण्याची आपली आवृत्ती सादर करताना त्यांनी अप्रतिम रोमँटिक वातावरण उभे केले आहे.सुपरहिट ठरलेल्या या गाण्याला पुनरुज्जीवीत करण्यासाठी हे कलाकार खूपच उत्सुक  होते. संजिदाने त्यासाठी खास पायघोळ गाऊन घालत या गाण्याचे चित्रिकरण पूर्ण केले. त्यामुळे आता सिनेमातल्या शाहरूख खान आणि काजोल या  जोडप्यांप्रमाणे हे स्मॉलस्क्रीन जोडपे आपल्या रोमँटीक अंदाजानी सा-यांना वेड लावतील यांत शंका नाही. या मालिकेचे सुरुवातीला नाव 'क्या तू मेरी लागे' असे ठेवण्यात आले होते मात्र काही कारणांमुळे यात बदल करत ‘लव्ह का है इंतजार’ असे नामकरण करण्यात आले आहे. 

Web Title: The small screen will be seen on 'Suraj Hua Medium' singing magic

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.