स्मिता म्हणतेय मराठी चित्रपट अभ्यासपुर्वक प्रदर्शित करावेत

By ऑनलाइन लोकमत | Published: February 18, 2016 05:08 AM2016-02-18T05:08:40+5:302016-02-17T22:23:12+5:30

    ७२ मैल एक प्रवास ...  जोगवा ... परतू ... या चित्रपटांतून  प्रेक्षकांच्या मनाला चटका लावणाºया सशक्त स्त्रीवादी ...

Smita says that Marathi films should be displayed in the study | स्मिता म्हणतेय मराठी चित्रपट अभ्यासपुर्वक प्रदर्शित करावेत

स्मिता म्हणतेय मराठी चित्रपट अभ्यासपुर्वक प्रदर्शित करावेत

googlenewsNext

/>
    ७२ मैल एक प्रवास ...  जोगवा ... परतू ... या चित्रपटांतून  प्रेक्षकांच्या मनाला चटका लावणाºया सशक्त स्त्रीवादी भुमिका अभिनेत्री स्मिता तांबे हीने रुपेरी पडद्यावर साकारल्या आहेत. अतिशय संवेदनशील व्यक्तिरेखा करताना त्यातील जिवंतपणा कायम ठेवत एक अभिनेत्री म्हणुन स्वत:ची स्वतंत्र ओळख व अस्तित्व तिने या मायावी चित्रपटनगरीत निर्माण केले आहे. सत्यकथा असो किंवा एखादी संवेदनात्मक कथा असे, वेगवेगळे विषय आपल्या अभिनय कौशल्याच्या जोरावर तिने प्रेक्षकांपुढे मांडण्याचा प्रयत्न केला आहे. मराठी चित्रपटसृष्टीविषयी, तिचे काय मत आहे, कोणत्या अडचणींना सामोरे जावे लागते, किंवा तिच्या या चित्रपटसृष्टीकडुन काय अपेक्षा आहेत हे तिने सेलिब्रिटी रिपोर्टरच्या भुमिकेतून मांडलेले आहे.

                                          
         

     मराठी चित्रपट जर सर्व प्रेक्षकांपर्यंत पोहचवायचा असेल, सर्वांनी तो पहावा असे जर आपल्याला वाटत असेल तर चित्रपट प्रदर्शनासाठी व्यवस्थित नियोजन करण्याची गरज आहे. आज आपल्याकडे एकाच वेळी सहा-सहा चित्रपट प्रदर्शित होतात. त्यामुळे प्रेक्षकांना कोणता चित्रपट पहायचा हा प्रश्न पडतो आणि प्रेक्षकवर्ग विभागला जातो. त्यामुळे इतर चित्रपटांवर अन्याय होतो. या गोष्टी टाळायच्या असतील तर आपल्याला चित्रपट प्रदर्शनासाठी रुल्स अ‍ॅन्ड रेग्युलेशन्स करावे लागतील. चित्रपटांच्या रिलीजिंगमध्ये नक्कीच गॅप घ्यायला हवी. तरच सर्व दर्जेदार चित्रपट प्रेक्षकांना पहायला मिळतील.
         मराठी सिनेमांचा प्रेक्षकवर्ग नक्कीच वाढला आहे हि चांगली बाब आहे, परंतू आजुनही आपण चित्रपटांचे प्रमोशन योग्यप्रकारे करीत नाही. कोणताही चित्रपट प्रदर्शित होण्यापुर्वी त्या चित्रपटासाठी प्रमोशनल ग्राऊंड अ‍ॅक्टीव्हीटी व्हायला पाहिजेत. चित्रपट प्रदर्शनापुर्वी थिएटर्स अ‍ॅवॅबिलिटी आहे का, हे पहावे. मोठ्या कंपन्या त्यांचे चित्रपट अभ्यापुर्वक रिलिज करतात. तसाच अभ्यास जर आपणही फिल्म रिलिज आधी केला तर त्याचा परिणाम चांगला होईल. 

                   
       
       ग्रामीण भागापर्यंत मराठी सिनेमा पोहचत नाही. अशी ओरड नेहमी ऐकायला मिळते. ग्रामीण भागातील शेतकरी हे खरे मराठी सिनेमाचे प्रेक्षक आहेत. दुष्काळी परिस्थितीचा परिणान सिनेमांवर होतो. ग्रामीण भागातील प्रेक्षकांना सिनेमाकडे खेचणे ही काळाची गरज आहे. परंतू ग्रामीण भागात किती थिएटर्स आहेत याचा देखील विचार करायला पाहीजे. आपल्याला जर आपला सिनेमा फक्त पुणे-मुंबई पर्यंतच मयर्दित ठेवायचा नसेल तर थिएटसर्ची संख्या वाढली पाहिजे. थिएटर्स वाढले तर मराठी प्रेक्षकांच्या संख्येत आपसुकच वाढ होईल आणि सिनेमा सर्वांपर्यंत पोहचेल. 
        मराठी सिनेमा हा क्लास आणि मास मध्ये अडकलाय असे मला मुळीच वाटत नाही. कारण माझा ७२ मैल हा सिनेमा फक्त मास साठी होता असे नाही तर तो क्लासच्या प्रेक्षकानी देखील पाहिला आणि अ‍ॅप्रिशिएट केला. त्यामुळे कोणता चित्रपट कोणासाठी आहे हे आपण ठरवू शकत नाही. चित्रपट हा प्रेक्षकांसाठी निर्माण केलेला असतो, त्यामुळे प्रत्येकाच्या वेगवेगळ््या आवडी-निवडी असतील हे निश्चित. 
       कलाकार हा कलाकारच असतो, त्यामुळे तो कुठे घडलाय यापेक्षा त्याने अभिनय कसा केला  हे महत्वाचे. रंगभुमीवर काम करण्याची पद्धत वेगळी असते. नाटकांमध्ये काम करताना तुम्हाला थेट प्रेक्षकांना सामोरे जावे लागते. तर तोच सीन काहीवेळेस टेक्नीकल गोष्टींमुळे स्क्रीनवर उठावदार दिसत नाही. उत्तम काम करण्यासाठी माणसाने सकारात्मक राहण्याची गरज असते. मी स्वत:च्या कामाबद्दल खुप पॉझिटिव्ह विचार करते. मला खुप वेगळ्या विषयांवरील चित्रपटांमध्ये काम करण्याची संधी मिळाली त्याबद्दल खरच खुप आनंदी आहे. 

                                        
         
          शुटिंगसाठी जेव्हा तुम्ही एखाद्या चित्रपटाच्या सेटवर जाता त्यावेळी प्रत्येक कलाकाराचा इन्शुरन्स असला पाहिजे. मी जेव्हा एका इंटरनॅशनल फिल्म फेस्टीव्हलसाठी परदेशात गेले होते त्यावेळी माझा इन्शुरन्स काढण्यात आला होता. सिनेमांच्या सेटवर दुर्घटना घडण्याची, अपघात होण्याची जास्त भीती असते त्यामुळे प्रिकॉरशन्स घेऊन कलाकारांचा देखील विमा उतरविण्यात यावा. 
          अभिनेत्यांच्या तुलनेत अभिनेत्रींना कमी पैसे मिळतात असे बोलले जात असले तरी याचा अनुभव मला अजुन आला नाही. कारण मी आजपर्यंत ज्या भुमिका केल्या त्या सर्व वुमेन ओरिऐंटेडच होत्या. मला कोणाच्या बहिणीचा किंवा हिरोईनचा रोल करावा लागला नाही. माझ्या फिल्मचा हिरो मी स्वत:च होते. परंतू काहीवेळेस प्रोड्युसरकडुन वेळेवर पैसे मिळत नाहीत. काही अभिनेत्रींना कमी मानधन मिळते. अशा प्रश्नांना सामोरे जायचे असेल तर सर्व कलाकारांनी एकत्र यायला पाहिजे. कलाकारांमध्ये युनिटी असणे गरजेचे आहे. मला माझ्या मागच्या वर्षीच्या चित्रपटाचे पैसे निर्मात्याकडुन अजुन मिळाले नाहीत असे प्रॉब्लेम्स येतातच. त्यामुळे असे प्रश्न सोडवायचे असतील तर सर्व कलाकारांनी एकत्र येण्याची आवशकता आहे.
                                             

Web Title: Smita says that Marathi films should be displayed in the study

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.