आईची काळजी घेण्यासाठी अभिनयातून घेतला ब्रेक, वाचून तुम्हालाही वाटेल अभिमानस्पद !
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 28, 2020 17:26 IST2020-02-28T17:25:53+5:302020-02-28T17:26:19+5:30
सोशल मीडियावर स्मृती खूपच अॅक्टिव असते. ती टीव्हीपासून दूर असली तरीही सोशल मिडीयावर नेहमी ती आपल्या फॅन्सच्या संपर्कात असते.

आईची काळजी घेण्यासाठी अभिनयातून घेतला ब्रेक, वाचून तुम्हालाही वाटेल अभिमानस्पद !
आपल्या अभिनय कौशल्यानं रसिकांच्या मनात स्थान मिळवणारी अभिनेत्री स्मृती कालराला सध्या काय करत आहे असा प्रश्न तिचा फोटो पाहून तुम्हालाही पडला असेल. तर सध्या ती सध्या अभिनय क्षेत्रातून ब्रेक घेत आपल्या आईची काळजी घेण्यात बिझी झाली आहे. आईची तब्येत ठीक नसते यामुळे जवळजवळ एक वर्षापासून तिने कोणत्याही शोमध्ये काम केलेले नाही.
आईसाठीच तिने काम सोडून तिची काळजी घेण्याला प्राधान्य दिले आहे. स्मृती सध्या काम करत नसली तरीही सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांच्या संपर्कात असते. सोशल मीडियावर स्मृती खूपच अॅक्टिव असते. ती टीव्हीपासून दूर असली तरीही सोशल मिडीयावर नेहमी ती आपल्या फॅन्सच्या संपर्कात असते.तसेच आपल्या मोकळ्या वेळेचा उपयोग जीवनात शांतता, समाधान मिळवण्यासाठी करत असल्याचे पाहायला मिळत आहे. स्मृती कालरा शेवटची 'दिल संभल जा जरा' मालिकेत दिसली होती. स्मृतीच्या पतीच्या भूमिकेत संजय कपूर झळकला होता.
तसेच स्मृतीला अभिनयाव्यतिरिक्त वेगवेगळे फुड खायला खूप आवडते. रात्री झोपेत जरी तिला काही खाण्याची इच्छा झाली तर ती अर्ध्या रात्री उठून काही ना काही खाते. ती सध्याकाळी 7 वाजताच जेवते त्यामुळे 9 वाजता परत भूक लागते. त्यामुळे खाण्याची ती खूप शौकीन आहे. इतकेच नाही तर अमेरिकेला फक्त बिग बर्गर खाण्यासाठी तिला जायचे असल्याचे तिने दिलेल्या मुलाखतीत म्हटले होते.