Bigg Boss Marathi 3 Update: तुम्हाला पण काही चार शब्द ऐकवायचे आहे का मला ? स्नेहा वाघचा चढला पारा
By ऑनलाइन लोकमत | Published: October 13, 2021 06:47 PM2021-10-13T18:47:26+5:302021-10-13T18:50:03+5:30
Bigg Boss Marathi 3 च्या कालच्या भागामध्ये पार पडलेल्या नॉमिनेशन कार्यामुळे सुरेखाची नाराजी सगळ्यांना दिसून आली.
'बिग बॉस मराठी सिझन ३' पहिल्या भागापासून विविध कारणांमुळे चर्चेत आला आहे. या शोमध्ये सर्वाधिक चर्चा होतेय ती स्पर्धक स्नेहा वाघची. स्नेहा वाघ कधी तिच्या खासगी आयुष्यामुळे चर्चेत असते. तर कधी घरातल्या कारनाम्यांमुळे चर्चेत असते. घरात होणाऱ्या टास्कमध्ये स्पर्धक एकमेकांना भिडताना दिसतात. इतकेच काय तर क्षुल्लक कारणावरुन वाद करताना दिसतात. असाच काहीसा प्रयत्न स्नेहा वाघनेही केला होता. घरात पहिला वाईल्ड कार्ड स्पर्धक आदिश वैद्यची एंट्री झाली तेव्हाच स्नेहाने त्याच्यावर निशाणा साधा होता. स्नेहा वाघने आदिशला टोमणे मारताना दिसली होती.
स्नेहा आदिशला म्हणाली, “आल्या आल्या त्रास दिला तुम्ही सगळ्यांना. जसं की आमचे तीन लोकं जखमी केले. त्यावर आदिश म्हणाला “कुठले तरी तीन होणारच होते. जर तू माझ्या जागी असतीस तर काय केलं असत ? स्नेहा म्हणाली “माझी पध्दत वेगळी असती. मी वेगळ्या पध्दतीने डील केलं असंत. म्हणजे माझ्या पध्दतीने मी डील केलं असंत. नॉट नेसेसरी की आपल्या कोणत्या गोष्टीने समोरच्याला त्रास झालाच पाहिजे, त्याचा त्रास कमी करुनसुध्दा गोष्टी करू शकतो. आदिश म्हणाला, “ त्या दृष्टीने मी पूर्ण प्रयत्न केला आहे”. स्नेहाला आदिशने तीन सदस्यांची निवड करणं चांगलेच खटकले होते.
बिग बॉस मराठीच्या कालच्या भागामध्ये पार पडलेल्या नॉमिनेशन कार्यामुळे सुरेखाची नाराजी सगळ्यांना दिसून आली. सगळ्यांसमोर काल व्यक्त देखील केली. आज स्नेहा, दादुस आणि सुरेखा याबद्दल बोलताना दिसणार आहेत. सुरेखा तिची नाराजी स्पष्टपणे स्नेहासमोर व्यक्त केली.सुरेखाच्या असं बोलण्याने स्नेहा कुठेतरी दुखावली गेली. स्नेहा सुरेखाला, म्हणाली “अरे ताई असं का बोलताय.” यावर सुरेखानेही म्हटलं की “या शब्दातच सांगते तुला, आम्हांला तिघांनाही तसं जाणवलं आहे.
आपल्याला जेव्हा कोणी नसतं तेव्हा आपण खांदा शोधतो आणि दुसरे मिळाले की ज्या पध्दतीने तू गेलीस...” स्नेहाने दादुस यांना देखील विचारले, “आता तुम्हाला काही बोलायचे आहे... मला काही चार शब्द ऐकवायचे आहेत का ? की तुम्हाला असं वाटतं आहे का माझ्याकडे नवीन खांदा आला तर तुम्हाला तिघांना मी विसरले ? दादुसचं म्हणण पडलं तू विसरली नाहीस पण... आता पुढे नेमकं यांचे हे संभाषण किती टोकाला जाणार हे पाहणे रंजक असणार आहे.