स्नेहा वाघ ‘मेरे साई’मध्ये परतली
By ऑनलाइन लोकमत | Published: October 18, 2018 12:28 PM2018-10-18T12:28:19+5:302018-10-18T12:30:33+5:30
प्रेक्षकांना स्नेहाने केलेली तुळसाची भूमिका खूप आवडली होती. प्रेक्षकांचे मनोरंजन करण्यासाठी स्नेहा पुन्हा एकदा तुळसाच्या रूपात मालिकेत परतत आहे.
सोनी एन्टरटेन्मेंट टेलिव्हिजनवर प्रसारित होत असलेल्या मेरे साई मालिकेतील आगामी कथानकात साई बाबांच्या समाधीची गोष्ट दाखवण्यात येणार आहे, ज्यात साई बाबा काही काळासाठी समाधी अवस्थेत जातात आणि सर्व लोक ते परत येण्याची प्रतीक्षा करतात. गावकर्यांबरोबरच या मालिकेत ज्या ज्या व्यक्तिरेखा आल्या आहेत, त्या सर्व या अद्भुत दृश्याचा भाग बनणार आहेत.
काही महिन्यांपूर्वी स्नेहा वाघ मेरे साई मालिकेत तुळसाच्या भूमिकेत दिसली होती. तुळसा खूप दुःखी होती आणि साईंनी तिची दुःख दूर केली होती. प्रेक्षकांना स्नेहाने केलेली तुळसाची भूमिका खूप आवडली होती. प्रेक्षकांचे मनोरंजन करण्यासाठी स्नेहा पुन्हा एकदा तुळसाच्या रूपात मालिकेत परतत आहे. यावेळी तुळसाला साई समाधीतून बाहेर येण्याची प्रतीक्षा आहे.
आपल्या पुनरागमनाबाबत स्नेहा खूप उत्साहित आहे. ती म्हणते, “मेरे साई मालिकेत माझे पुनरागमन होत आहे, या गोष्टीने मी खूप उत्साहित आहे. विशेष उत्साहाचे कारण म्हणजे, साईंच्या समाधीचे चित्रण मी प्रत्यक्ष समोरून पाहून शकेन. हा महिना साईंच्या समाधीचा 100वा स्मृती मास आहे. साई बाबांच्या समाधीची गोष्ट मी ऐकली होती आणि मला पूर्ण खात्री आहे की, याच्या चित्रीकरणादरम्यान खूप मजा येणार आहे.”