स्नेहा वाघने दिली सुवर्णमंदिराला भेट!
By ऑनलाइन लोकमत | Published: March 28, 2017 06:59 AM2017-03-28T06:59:48+5:302017-03-28T12:29:48+5:30
‘शेर-ए- पंजाब : महाराजा रणजितसिंग’ या भव्य ऐतिहासिक मालिकेला सुरूवात झाली आहे. त्याच दिवशी या मालिकेत महाराजा रणजितसिंग यांची ...
‘ ेर-ए- पंजाब : महाराजा रणजितसिंग’ या भव्य ऐतिहासिक मालिकेला सुरूवात झाली आहे. त्याच दिवशी या मालिकेत महाराजा रणजितसिंग यांची आईची,राज कौर यांची भूमिका साकारणारी अभिनेत्री स्नेहा वाघने अमृतसरमधील सुवर्ण मंदिराला भेट दिली आणि या मालिकेसाठी गुरूंचे आशीर्वाद घेतले. ‘शेर-ए- पंजाब : महाराजा रणजितसिंग’ ही ऐतिहासिक मालिका महाराजा रणजितसिंग यांच्या जीवनावर आधारित आहे. रणजितसिंग हे एक शीख योध्दा होते, जे लहान वयातच राजा बनले. पण त्यांनी अधिकार गाजविण्याऐवजी सामान्य रयतेची सेवा करण्यास प्राधान्य दिले. त्यांनीच गरीबांसाठी गुरुद्वारांमधून मोफत जेवण देण्याची सुविधा (लंगर) सुरू केली. तसेच अद्वितीय कोहिनूर हि-याची मालकी असलेले ते शेवटचे भारतीय राजा होते. रणजितसिंग यांची फारशी ज्ञात नसलेली अनेक गुणवैशिष्ट्य़े या मालिकेद्वारे प्रेक्षकांपुढे सादर केली जातील. पंजाबच्या या शूर राजाची कथा प्रथमच टीव्ही मालिकेच्या रूपात सादर केली जाणार आहे. त्यांनीच या मंदिराला सुवर्ण साज चढवून त्याला सुवर्णमंदिर असे नामाभिधान प्राप्त करवून दिले. त्यांचे या मंदिराशी असलेले नाते इतके वैश्विक आहे की स्नेहा वाघला त्याची जाणीव तिथे गेल्यावर झाली. त्यामुळेच तिने सुवर्णमंदिराला भेट देऊन या मालिकेसाठी गुरूंचे आशीर्वाद घेतले.तिच्या सुवर्णमंदिर भेटीबद्दल विचारले असता स्नेहा वाघ म्हणाली, “तिथे भेट देऊन आल्यावर मला दैवी आशीर्वाद मिळाल्यासारखे वाटते. मी तिथे पोहोचले, तेव्हा सुखासन सुरू होते. ते संपेपर्यंत मी तिथे राहिले. तो कार्यक्रम संपल्यावर मला लगेचच प्रसाद मिळाला आणि मंदिरातून परत जाताना मवा खूप आनंद वाटला. कारण मी स्वत:ला भाग्यवान समजत होते. ही मालिका ज्या दिवशी प्रसारित होणार होती, त्याच दिवशी मी सुवर्णमंदिरात गेले, ही फार उत्तम गोष्ट झाली, असं मला वाटतं. ही मालिका तयार करण्यासाठी गेल्या सहा महिन्यांपासून आम्ही जे परिश्रम घेतले, त्याला प्रेक्षकांचा प्रतिसाद कसा मिळतो, हे पाहण्याची उत्सुकता मला लागल्याने मला थोडे दडपण आले आहे.”