'स्वराज्यरक्षक संभाजी' फेम स्नेहलता वसईकर दिसणार नव्या मालिकेत, साकारणार निगेटिव्ह भूमिका
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 8, 2023 17:15 IST2023-12-08T17:14:56+5:302023-12-08T17:15:14+5:30
Snehlata Vasaikar : स्वराज्यरक्षक संभाजी, अहिल्या मालिकेतील ऐतिहासिक भूमिका तर कधी ‘अनुराधा’ सिरीजमध्ये साकारलेली जिगरबाज लेडी पोलीस ऑफिसर अशा वेगवेगळ्या रूपात दिसलेली अभिनेत्री स्नेहलता वसईकर नेहमी चर्चेत येत असते. लवकरच स्नेहलता एका नव्या मालिकेत नव्या भूमिकेत दिसणार आहे.

'स्वराज्यरक्षक संभाजी' फेम स्नेहलता वसईकर दिसणार नव्या मालिकेत, साकारणार निगेटिव्ह भूमिका
स्वराज्यरक्षक संभाजी, अहिल्या मालिकेतील ऐतिहासिक भूमिका तर कधी ‘अनुराधा’ सिरीजमध्ये साकारलेली जिगरबाज लेडी पोलीस ऑफिसर अशा वेगवेगळ्या रूपात दिसलेली अभिनेत्री स्नेहलता वसईकर नेहमी चर्चेत येत असते. लवकरच स्नेहलता एका नव्या मालिकेत नव्या भूमिकेत दिसणार आहे. सन मराठी वाहिनीवर सुरू होणारी नवीन मालिका 'तुझी माझी जमली जोडी'मध्ये स्नेहलता निगेटिव्ह भूमिकेत दिसणार आहे.
'मैत्री श्रीमंतीचा नाही तर मनाचा मोठेपणा बघते' हे वाक्य पटवून देण्यासाठी ११ डिसेंबरपासूनही नवीन मालिका भेटीला येत आहे. खलनायिका किंवा खलनायक यांच्याशिवाय दोन व्यक्तींचं प्रेम किंवा मालिकेची कथा पुढे कशी सरकणार ना... कथेमध्ये ट्विस्ट तर हवाच. तर 'तुझी माझी जमली जोडी' मध्ये अभिनेत्री स्नेहलता वसईकर खलनायिकेची भूमिका साकारणार आहे. स्नेहलता वसईकर साकारणार असलेल्या भूमिकेचं नाव 'भैरवी' आहे जी संचित चौधरीची आत्या दाखवली आहे. श्रीमंत घराण्याला शोभेल असं दिमाखदार, सुंदर व्यक्तिमत्त्व , शिष्टाचाराने वागेल असा स्वभाव, आणि अर्थात श्रीमंतीचा गर्व असणारं असं हे 'भैरवी'चं पात्र आहे. यापूर्वी कधीही न पाहिलेल्या भूमिकेत स्नेहलता वसईकर यांना पाहणं रंजक ठरणार आहे.
दोन अनोळखी व्यक्ती, त्यांच्यात झालेली मैत्री, मैत्रीच्या नात्यामुळे त्या दोघांमध्ये झालेले विचारांचे आदान प्रदान आणि मैत्रीमुळेच फुलणारे त्यांचे प्रेम अशी या मालिकेची गोड गोष्ट आहे. अभिनेत्री अस्मिता देशमुख आणि अभिनेता संचित चौधरी ही नवीन जोडी या मालिकेत प्रमुख भूमिका साकारणार आहेत. नुकतेच या मालिकेचे प्रोमो सोशल मीडियावर रिलीज झाले आहे आणि या मालिकेचे प्रोमो पाहून प्रेक्षकांची उत्सुकता वाढली आहे. 'तुझी माझी जमली जोडी' येत्या ११ डिसेंबर पासून सोमवार ते शनिवार रात्री १०:३० वाजता फक्त सन मराठी वाहिनी वर पाहायला मिळणार आहे.