म्हणून चिन्मय उदगीर म्हणतोय रिअल आणि रिल लाईफ 'सेम टू सेम'
By ऑनलाइन लोकमत | Published: August 19, 2017 06:12 AM2017-08-19T06:12:48+5:302017-08-19T11:44:25+5:30
कलाकाराचं रिल आणि रियल लाइफ कसं आहे याचं कुतूहल अनेकांना असतं. कलाकारांच्या रियल लाइफबद्दल जाणून घेण्याची त्यांच्या फॅन्सची इच्छा ...
क ाकाराचं रिल आणि रियल लाइफ कसं आहे याचं कुतूहल अनेकांना असतं. कलाकारांच्या रियल लाइफबद्दल जाणून घेण्याची त्यांच्या फॅन्सची इच्छा असते. पडद्यावर दिसणारा कलाकार प्रत्यक्ष जीवनात कसा आहे, त्याच्या आयुष्यात काय काय घडते याबाबत रसिकांच्या मनात प्रचंड उत्सुकता असते. मात्र ब-याचदा पडद्यावर भूमिका साकारणारा कलाकार आणि त्याचं प्रत्यक्ष जीवन यांत बराच फरक असतो. रुपेरी पड्यावर निगेटिव्ह शेड भूमिका साकारणारा कलाकार तितकाच प्रेमळ असल्याचे पाहायला मिळते. मात्र अभिनेता चिन्मय उदगीरकरबाबत काहीसं वेगळं आहे. त्याचं रिल लाईफ आणि रियल लाईफ समांतर सुरू आहे. हे आम्ही नाही तर खुद्द चिन्मयनंच सीएनएक्समस्तीशी संवाद साधताना सांगितलं आहे. छोट्या पडद्यावरील 'स्वप्नांच्या पलीकडे' ही मालिका प्रेमावर आधारित होती. त्यामुळेच की काय आयुष्यात गिरीजा जोशीची एंट्री झाली असं चिन्मयला वाटतं. यानंतर 'नांदा सौख्य भरे' नावाच्या मालिकेत त्यानं काम केलं. ही मालिका लग्न या विषयावर आधारित होती. त्याच काळात चिन्मय गिरीजासह रेशीमगाठीत अडकला. आता चिन्मयची नवी मालिका रसिकांच्या भेटीला आली आहे. 'घाडगे अँड सून' नावाच्या मालिकेतून तो रसिकांच्या भेटीला आला आहे. या मालिकेत पती-पत्नी, संसार अशा गोष्टी दाखवण्यात आल्यात. या मालिकेमुळे संसार करायला शिकणार असल्याचं चिन्मयनं म्हटलं आहे. ज्यारितीने चिन्मयच्या करियरमध्ये घडामोडी घडतायत तशाच समांतर पद्धतीने त्याच्या ख-याखु-या जीवनातही बदल होत आहेत. मात्र या मालिकेत आई आणि पत्नी या दोघींपैकी कुणाची बाजू घ्यावी असा प्रश्न चिन्मयला पडल्याचं पाहायला मिळतं. असं असलं तरी रियल लाइफमध्ये पत्नी आणि आई या दोघींमध्ये आपलं सँडविच होत नाही याचा आनंद चिन्मयला आहे. कारण ख-या आयुष्यात गिरीजा आणि चिन्मयच्या आईची केमिस्ट्री चांगलीच जुळते. आईचे सगळे निरोप गिरीजाच चिन्मयपर्यंत पोहचवते. या नव्या मालिकेच्या निमित्ताने घडलेल्या आणखी एका गोष्टीमुळे चिन्मयचे कुटुंबीय त्याच्यावर भलतेच खुश आहेत. कारण या मालिकेचा सेट त्याच्या घरापासून अगदी जवळ आहे. त्यामुळे चिन्मयची पत्नी गिरीजा आणि सगळे कुटुंबीय आनंदित आहेत. मुंबईप्रमाणे ट्रॅफिक लागत नसल्याने चिन्मय वेळेत घरी पोहचत असून तो कुटुंबीयांनाही वेळ देऊ शकत असल्याचा विशेष आनंद त्यांना आहे.