म्हणून फैझल रशीद देतो पार्टीपेक्षा कामाला प्राधान्य!
By ऑनलाइन लोकमत | Published: March 24, 2017 12:44 PM2017-03-24T12:44:24+5:302017-03-24T18:14:24+5:30
‘हर मर्द का दर्द’ मालिकेतील आपल्या भूमिकेने फैझल रशीदने सर्व प्रेक्षकांची मने जिंकून घेतली आहेत. पण या यशामुळे केवळ ...
‘ र मर्द का दर्द’ मालिकेतील आपल्या भूमिकेने फैझल रशीदने सर्व प्रेक्षकांची मने जिंकून घेतली आहेत. पण या यशामुळे केवळ पार्टी करण्यापेक्षा पूर्वीपेक्षा अधिक काम करण्यास फैझलने प्राधान्य दिले आहे.यासंदर्भात फैझलने सांगितले, “या मालिकेला मिळत असलेल्या उदंड प्रतिसादाबद्दल मी अर्थातच आनंदी आहे; पण त्यामुळे पूर्वीपेक्षा अधिक मेहनत घेण्याची जबाबदारी माझ्यावर आली आहे.” फैझल या मालिकेत केवळ महिलांच्या कॉलेजात प्राध्यापक असलेल्या विनोद खन्नाची भूमिका साकारीत आहे. अभिनेत्री झिनल बेलाणी ही त्याची पत्नी सोनू हिची भूमिका साकारीत आहे. महिलांच्या मनातील विचार जाणून घेण्यासाठी विनोदला एक मणी प्राप्त होतो, अशी या मालिकेची संकल्पना आहे.फैझलने सांगितले, “या क्षेत्रात कलाकाराला वर चढण्यास वेळ लागत नाही आणि लोकप्रियतेच्या शिखरावरून खाली घसरायलाही वेळ लागत नाही. त्यामुळे यश साजरं करण्यासाठी पार्टी करीत राहण्यापेक्षा अधिक कठोर परिश्रम घेऊन काम करावं ज्यामुळे कोणाला माझी जागा घेता येऊ नये, याला मी प्राधान्य देतो.” त्याने काही हिंदी चित्रपटांमध्येही भूमिका साकारल्या असून त्यासंदर्भात तो सांगतो, “माझा चेहरा किंवा देहयष्टी ही काही एखाद्या हिंदी चित्रपटाच्या हिरोला साजेशी नाही. पण आज मी जे यश कमावलं आहे, ते केवळ माझ्या कठोर परिश्रमांच्या जोरावर.”