म्हणून लारा दत्ताने केले आशिष पटेलचे कौतुक

By ऑनलाइन लोकमत | Published: April 19, 2018 09:00 AM2018-04-19T09:00:06+5:302018-04-19T14:30:06+5:30

‘हाय फिवर ... डान्स का नया तेवर’ या गाजलेल्या शोमध्ये डान्सची प्रत्येक जोडी जिंकण्यासाठी एकमेकांशी स्पर्धा करते. पण कॅमेरामागे ...

So Lara Dutt has appreciated Ashish Patel | म्हणून लारा दत्ताने केले आशिष पटेलचे कौतुक

म्हणून लारा दत्ताने केले आशिष पटेलचे कौतुक

googlenewsNext
ाय फिवर ... डान्स का नया तेवर’ या गाजलेल्या शोमध्ये डान्सची प्रत्येक जोडी जिंकण्यासाठी एकमेकांशी स्पर्धा करते. पण कॅमेरामागे मात्र ते एका कुटुंबाप्रमाणे आहेत. चढत्या उतरत्या काळात एकमेकांना सोबत करणाऱ्या ह्या असामान्य जोड्यांमध्ये एक विलक्षण बांधिलकी निर्माण झाली आहे. आशिष आणि ऋतुजा या जोडीतील आशिषने नुकतेच आपले मित्रविरहित व संघर्षमय बालपण तसेच आपले पौंगडावस्थेततील दिवस याविषयी सांगितले. हाय फिवरने त्याला आयुष्यभरासाठी मित्र दिले ह्याबद्दलही तो बोलला.आशिष व ऋतुजाच्या नेत्रदीपक परफॉर्मन्सनंतर आशिषला त्याच्या अप्रतिम कामगिरीसाठी बऱ्याच जणांकडून कौतुक लाभलं.ह्या स्तुती व प्रोत्साहनाने आशिष भावनिक झाला आणि स्वतः साठी हे मिळवत असताना आपण काय परिश्रम घेतले याबद्दल त्याने जजेसना सांगितले. घरात एक डान्सर हवा हे आपल्या आईचे स्वप्न पूर्ण
करण्यासाठी त्याने वयाच्या ४ थ्या वर्षापासून डान्स शिकायला सुरुवात केली आणि शाळा व कॉलेजमध्ये होणाऱ्या छेडछाडीमुळे तो एकलकोंडा व लाजाळू बनत गेला.त्याच्या नृत्याप्रतीच्या प्रेमापोटी तो इतरांचे प्रेम मात्र जिंकू शकला नाही.शाळा व कॉलेजमध्ये त्याला कोणीच मित्र नव्हते; सगळीकडे त्याला चिडवले जायचे आणि वाळीत टाकल्यासारखे कोणीच त्याला आपल्यासोबत घेत नव्हते. त्याच्याच शब्दांत सांगायचे झाले तर - “मी कितीतरी दिवस टॉयलेटमध्ये रडत काढलेत. पण मला धीर द्यायला कोणीच आले नाही.शिक्षक नाही, मित्र नाही, कोणीही नाही. मी इतका एकटा पडलो होतो की मी आत्महत्या करणार होतो.पण फक्त एका घटनेमुळे, एका स्पार्कमुळे मला हे टोकाचे पाऊल घेण्यापासून परावृत्त केले आणि त्यानंतर मी पुन्हा कधीच मागे वळून पाहिले नाही. हाय फिवरने फक्त माझी प्रतिभाच ओळखली असे नाही तर मी आयुष्यभर जतन करून ठेवीन अशा आठवणी व नातीसुद्धा दिली”.गेस्ट जज म्हणून आलेला लोकप्रिय रॅपर बादशाह, हा आशिषच्या नृत्याविषयीच्या चिकाटीबद्दल व त्याच्या पराकोटीच्या उत्साहाने भारावून गेला. त्याने मंचावर जाऊन आशिषला मिठी मारली.आशिषसाठी त्याने प्रोत्साहन देणारे उद्गार काढले. तो म्हणाला,“तुला अडवण्याचा प्रयत्न करणारे सगळे लोक आज कुठेच नाहीत.ह्या भव्य मंचावर उभं राहून जो परफॉर्म करतोय व लाखो लोकांच्या हृदयात आपले स्थान निर्माण करतोय तो तू आहेस.” ह्याविषयी पुढे बोलताना लारा दत्ता म्हणाली की, “आशिष एकदिवस आम्ही तुला अशाच एका रियालिटी शोच्या जजेस पॅनेलवर पाहू. संघर्ष जितका कठीण असतो, यशाची फळे तितकीच गोड असतात.मी कागदावर तुला लिहून देऊ शकते की, ही फक्त सुरुवात आहे”.अहमद खानने हृद्य हेलावणारे विधान केले, ते म्हणाले, “तुझा हा प्रवास म्हणजे देशाला सांगावा असा एक संदेश आहे आणि मला वाटते की माझ्या मुलांनी त्यावर विचार करावा. तुला आत्महत्येपासून परावृत्त करणाऱ्या स्पार्कचा तू उल्लेख केलास, त्या स्पार्कला कधीही विसरू नकोस आणि जितके शक्य होईल तितकी त्या स्पार्कविषयी माहिती पसरव. तुझे खच्चीकरण करणाऱ्या व अपमान करणाऱ्या लोकांची तू स्तुतीच करत आलास.तसं पाहायला गेलं तर तुझीच प्रशंसा करायला हवी कारण त्यांच्या कठोर शब्दांना तू सहन केलेस आणि तरीही त्यांचीच प्रशंसा करतो आहेस.” आशिष तुझा प्रवास खरोखर प्रेरणादायी आहे.

Web Title: So Lara Dutt has appreciated Ashish Patel

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.