म्हणून परमसिंह झोपला बर्फाच्या लादीवर

By ऑनलाइन लोकमत | Published: February 21, 2017 06:54 AM2017-02-21T06:54:19+5:302017-02-21T17:15:02+5:30

मालिकेत रोमँटीक ट्रॅक येणार नाही हे तर अशक्यच आहे. काही दिवस  रसिकांना कलाकरांची ओळख करून देण्यात जातात आणि काही ...

So on Paramasinh's sleeping snow lane | म्हणून परमसिंह झोपला बर्फाच्या लादीवर

म्हणून परमसिंह झोपला बर्फाच्या लादीवर

googlenewsNext
लिकेत रोमँटीक ट्रॅक येणार नाही हे तर अशक्यच आहे. काही दिवस  रसिकांना कलाकरांची ओळख करून देण्यात जातात आणि काही दिवसानंतर लगेचच प्रेमाचे वारे वाहु लागल्याचे मालिकेत पाहायला मिळाते.नुकतेच 'गुलाम' ही नवी मालिका रसिकांच्या भेटीला येऊन अवघे काही दिवसच झाले आहेत.  मलिकेतील रंगीला (परमसिंह) आणि शिवानी (निती टेलर) यांच्यात अखेरीस प्रेमाचा अंकुर फुटल्याचे दिसू लागले आहे. रंगीला आता शिवानीबद्दल मृदू होत आहे.अर्थात याचा अर्थ वीर (विकास मानकताला) आणि त्याच्या कुटुंबियांकडून रंगीला आणि शिवानी यांच्यावर होत असलेल्या अत्याचारांमध्ये घट झाली आहे, असे अजिबात नाही.मालिकेच्या आगामी भागांमध्ये दिसेल की आपल्या मालकाच्या गुलामीतून परवानगीशिवाय एक दिवस काढल्याबद्दल ते रंगीलाचा मानसिक छळ करताना दिसतील. आपल्याला मादक द्रव्य न दिल्याबद्दल वीरचा भाऊ आपल्या आईशी वाईट वर्तणूक करतो. पण त्याचे सारे खापर रंगीलावर फुटेल; कारण आजपर्यंत त्याने वीरला न सांगता काहीही केलेले नसते.पण आज प्रथमच वीरला रंगीला कुठे आहे, त्याची काहीही कल्पना नसते.त्याच्या या कृत्याबद्दल वीर (विकास मानकताला) रंगीलाचा (परमसिंह) अनन्वित छळ करतो. त्याला बर्फाच्या लादीवर झोपायला लावतो. ते पाहून शिवानीला खूपच धक्का बसतो कारण रंगीलाला हा सारा छळ सहन करावा लागेल, अशी कल्पनाही तिला नसते.“या प्रसंगाचं चित्रीकरण करणं मला कठीण गेलं. काही काळानंतर माझं शरीर सुन्न झालं. मला बराच काळ बर्फाच्या लादीवर एकाच बाजूस झोपून राहावं लागल्यानं शरीरातील रक्ताभिसरण थांबलं. काही काळानंतर माझ्या शरीराला कसल्याही संवेदनाच जाणवू लागल्या नाहीत. हा माझ्या जीवनातील सर्वात कठीण प्रसंग होता,” असे परमसिंहने सांगितले.

Web Title: So on Paramasinh's sleeping snow lane

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.