म्हणून चक्क 'या' व्यक्तीनेच केतकीच्या तोंडाला लावली टेप!
By ऑनलाइन लोकमत | Published: May 3, 2018 10:39 AM2018-05-03T10:39:16+5:302018-05-03T16:09:16+5:30
प्रेमविवाहाच्या गाठी या प्रेमानेच बांधल्या जातात पण काही काळ लोटला की यातील केवळ विवाह एवढाच शब्द उरतो आणि प्रेमाचा ...
प रेमविवाहाच्या गाठी या प्रेमानेच बांधल्या जातात पण काही काळ लोटला की यातील केवळ विवाह एवढाच शब्द उरतो आणि प्रेमाचा गोडवा हळू हळू ओसरु लागतो. अशाच हलक्या फुलक्या वादांची आणि प्रेमाच्या नात्याची गोष्ट म्हणजे झी मराठी वरील 'तुझं माझं ब्रेकअप' ही मालिका.या मालिकेतील मीरा आणि समीर अनेक तरुण जोडप्याचं जणू काही प्रतिनिधित्वच छोट्या पडद्यावर करत आहेत.ही दोन्ही पात्र महाराष्ट्राच्या घराघरात पोहोचली आणि प्रत्येक विवाहित जोडप्याशी काही प्रमाणात संबंधित असलेली ही कथा प्रेक्षकांना भावली.या मालिकेतील मीरा म्हणजेच अभिनेत्री केतकी चितळे ही पडद्यावर खूप शिस्तबद्ध मुलीचं पात्र साकारते पण खऱ्या आयुष्यात मात्र केतकी खूप बोलकी आहे.शूटिंगच्या दरम्यानदेखील ती सेटवर खूप बोलते.ती खूप बोलते म्हणून,तिच्या डीओपीनं तिच्या तोंडावर टेप लावली म्हणजे जेणेकरुन ती जरा शांत बसेल.केतकीने तिच्या तोंडाला टेप लावलेला तिचा फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे. त्यात ती असं म्हणाली आहे,जेव्हा तुमचा डीओपी तुम्ही खूप बोलता हे लक्षात आणून देण्यासाठी तुमच्या तोंडाला टेप लावतो, तेव्हा कळतं की आपण शांत बसलं पाहिजे.पडद्यावरची शिस्तबद्ध मीरा आणि पडद्यामागची बोलकी केतकी,दोघीही सर्वांचं मनोरंजन करतात हे म्हणणं खोटं ठरणार नाही.
समीर घराची श्रीमंती असल्याने हवं ते हवं तेव्हा त्याला हातात मिळतं. त्यामुळे वेगळ्या कष्टाची आणि शिस्तीची त्याला कधीच सवय लागली नाही. तर दुसरीकडे मीरा एका मध्यमवर्गीय कुटुंबातील शिस्तबद्ध मुलगी. स्वतःचे काम स्वतः करणारी आणि कुणी काम करताना पसारा केला की त्याला धारेवर धरणारी.असे हे भिन्न स्वभावाचे दोन जीव एकमेकांच्या प्रेमात पडतात आणि त्यात आकंठ बुडतातही. असे म्हणतात की, प्रेम हे आंधळं असतं आणि लग्नानंतर डोळे उघडतात तसेच काहीसे यांच्या बाबतीतही होते. लग्नानंतर सुरुवातीचे काही दिवस प्रेम आणि आनंदात पार पडतात पण त्याचा गोडवा ओसरला की मग सुरू होते संसाराची तारेवरची कसरत.लग्नाआधी एकमेकांच्या अवगुणांवर पडदा टाकणारे हे दोघे लग्नानंतर कोणताही आडपडदा न ठेवता एकमेकांच्या चुका काढायला लागतात आणि भांडायलाही लागतात.लग्नाआधी एकमेकांचा दुरावा एक क्षणही सहन न करणारे आता एकमेकांनाच सहन करतायत की काय असे चित्र निर्माण होते आणि बघता बघता हे भांडण एवढ्या टोकावर जाते की, ते दोघे वेगळे होण्याचाही निर्णय घेतात.लग्नानंतर वर्षभरातच वेगळे झाल्यानंतर त्यांना एकमेकांची उणीव भासायला लागते आणि प्रेमाची जाणीवही व्हायला लागते.मग ते दोघे पुन्हा एकत्र येण्याचा निर्णय घेतात.घाईने प्रेमात पडणाऱ्या आणि घाईने लग्नाच्या गाठी जोडणाऱ्या जोडप्यांच्या सुखी संसाराची स्वप्नं अपेक्षांच्या कसोटीवर खरी उतरतात का? अशा सगळ्या गोष्टींना अधोरेखीत करणारी मजेदार गोष्ट तुझं माझं ब्रेकमध्ये दाखवण्यात आली आहे.