म्हणून ‘गुलाम’मालिका भाष्य करणार तृतीयपंथीयावर

By ऑनलाइन लोकमत | Published: February 14, 2017 07:23 AM2017-02-14T07:23:17+5:302017-02-14T12:53:17+5:30

समाजात तृतीयपंथाना अपमानास्पद वागणूक दिल्याचे सर्रास पाहायला मिळते.मात्र ते ही समाजाचा एक भाग आहेत अशी भावनेने कोणीही त्यांच्याशी आदराने ...

So the 'slave' will comment on the third party | म्हणून ‘गुलाम’मालिका भाष्य करणार तृतीयपंथीयावर

म्हणून ‘गुलाम’मालिका भाष्य करणार तृतीयपंथीयावर

googlenewsNext
ाजात तृतीयपंथाना अपमानास्पद वागणूक दिल्याचे सर्रास पाहायला मिळते.मात्र ते ही समाजाचा एक भाग आहेत अशी भावनेने कोणीही त्यांच्याशी आदराने वागत नाही. त्यांच्याकडे बघण्याचा दृष्टीकोन बदलावा या हेतूने गुलाम मालिकेत एक विशेष भागाचे प्रसारण करायचे ठरवले आहे. समाजात  तृतियपंथीयांचे स्थान महत्त्वाचे असले, तरी टीव्हीवरील कार्यक्रमांनी आजपर्यंत त्यांच्याकडे दुर्लक्षच केले आहे. म्हणूनच ‘लाईफ ओके’वरील ‘गुलाम’ मालिकेच्या निर्मात्यांनी आपल्या पटकथेत बदल करून तृतीयपंथीयांचा सहभाग असलेला एक विशेष भाग चित्रिकरण केले आहे. याद्वारे मालिकेच्या आगामी भागात शिवानी (निधी टेलर) आणि रश्मी (सारिका धिल्लाँ) यांना बेरहमपूर गावातून  बाहेर पडण्यासाठी  हे तृतियपंथी मदत करतात. असे दाखविण्यात आले आहे. बेरहमपूर ही एक काल्पनिक जागा असून ती भारताची गुन्हेगारीची राजधानी आहे, असे दाखविले आहे.



तृतीयपंथीयांसंबंधी आपली भूमिका स्पष्ट करताना निधीने सांगितले, “तीसुध्दा माणसंच असून त्यांनाही समान अधिकार आहेत. समाज त्यांच्याकडे तुच्छतेने बघतो, हे पाहून मला खूप वाईट वाटतं. मी गुलाम मालिकेशी निगडित असल्याचा मला आनंद आणि अभिमान वाटतो, कारण आम्ही या मालिकेद्वारे महिलांनी आपले हक्क बजावून घेण्यास जसं उत्तेजन देतो, तसंच या विशेष भागाद्वारे आम्ही हे दाखवून देणार आहोत की हे तृतियपंथीय प्रसंगी आपले जीवन धोक्यात घालून कसे मला आणि रश्मीला धोक्यापासून वाचवितात.”निधी म्हणाली, “आम्ही ज्या तृतियपंथीयांबरोबर चित्रीकरण करीत होतो, ते सर्व इतके विनोदी आणि आमची काळजी घेणारे होते की आम्ही चित्रीकरणाच्या वेळी खूप मजा केली. इतकी की पॅक-अपनंतर आम्ही एकत्रच जेवलो आणि नंतर काही काळ गप्पा मारल्या. मी त्यांना लवकरच माझ्या घरी भेटायला बोलाविलं आहे.”

Web Title: So the 'slave' will comment on the third party

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.