सोशल मीडियावर भाऊ कदम,कुशल आणि श्रेयाचा पाऊट घालतोय धुमाकूळ, कसा वाटला तुम्हाला त्यांचा हा अंदाज?
By ऑनलाइन लोकमत | Published: May 21, 2018 08:33 AM2018-05-21T08:33:52+5:302018-05-21T14:03:52+5:30
थुकरटवाडीतील प्रत्येक विनोदवीर रसिकांचे धम्माल मनोरंजन करत असतो.कॉमेडीचे भन्नाट टायमिंग आणि धम्माल मस्ती यामुळे थुकरटवाडीतील या विनोदवीरांचा 'चला हवा ...
थ करटवाडीतील प्रत्येक विनोदवीर रसिकांचे धम्माल मनोरंजन करत असतो.कॉमेडीचे भन्नाट टायमिंग आणि धम्माल मस्ती यामुळे थुकरटवाडीतील या विनोदवीरांचा 'चला हवा येऊ द्या' हा शो तुफान लोकप्रिय ठरला आहे. कुशल बद्रिके, सागर कारंडे, भारत गणेशपुरे, भाऊ कदम, डॉ. निलेश साबळे आणि श्रेया बुगडे रसिकांचे मनोरंजन करण्यात कोणतीही कसर सोडत नाहीत. रसिकांना ते पोटधरुन हसवतात. शोमध्ये असो किंवा सेटवर हे कलाकार धम्माल मस्ती करण्याची तसंच एकमेकांची खोडी काढण्याची संधी सोडत नाहीत. या शोच्या सेटवर कायमच खेळीमेळीचं आणि धम्माल मस्तीचं वातावरण असतं. या शोमध्ये श्रेया बुगडे ही एकमेव महिला कलाकार आहे. मात्र तिला तसं कधीच वाटत नसावं. कारण भाऊ कदम, कुशल बद्रिके आणि सागर कारंडे स्त्रीरुप धारण करुन रसिकांना खळखळून हसवत असतात. सध्या सोशल मीडियावर या शोमधील कलाकारांचा एक सेल्फी व्हायरल होत आहे. यांत कुशल बद्रिके, भाऊ कदम आणि श्रेया बुगडे पाऊट करत असल्याचे पाहायला मिळत आहे. यांत भाऊ आणि कुशल यांनी साडी परिधान केली असून या तिघांचा हा पाऊट देण्याचा अंदाज रसिकांना भावतो आहे. या फोटोला रसिकांकडून तुफान प्रतिसाद मिळतो आहे. तसंच कमेंट आणि लाइक्सचा वर्षाव होत आहे.
cnxoldfiles/a> दोघांची जेवणाची आवड आणि पत्नी काय जेवण करते असा संवाद या दोघांमध्ये रंगल्याचं दिसतंय. या व्हिडीओसह कुशलने एक पोस्टही टाकली आहे. “बायकोच्या मिठीत आयुष्य काढण्याची स्वप्नं बघता बघता आपण कधी तिच्या मुठीत जातो कळतं नाही. अनुभवाने सांगतो खूप हसवणाऱ्या माणसाच्या आयुष्यात खूप दुःख दडलेले असतं” अशी पोस्टही कुशलने या व्हिडीओसह शेअर केली आहे. चला तर मग तुम्हीही जाणून घ्या काय आहे कुशलच्या मनातलं दुःख.