'कच्चा बदाम' गर्लने दिल्लीत खरेदी केलं आलिशान घर, MMS व्हिडिओ प्रकरणी आली होती चर्चेत

By ऑनलाइन लोकमत | Published: December 7, 2023 10:32 AM2023-12-07T10:32:56+5:302023-12-07T10:33:28+5:30

कंगना रणौतच्या 'लॉकअप' या रिएलिटी शोमधून अंजली अरोरा प्रसिद्धीझोतात आली होती.

social media influencer Anjali Arora bought new house in delhi worth 4 cr | 'कच्चा बदाम' गर्लने दिल्लीत खरेदी केलं आलिशान घर, MMS व्हिडिओ प्रकरणी आली होती चर्चेत

'कच्चा बदाम' गर्लने दिल्लीत खरेदी केलं आलिशान घर, MMS व्हिडिओ प्रकरणी आली होती चर्चेत

सोशल मीडिया एन्फ्लुएन्सर अंजली अरोरा (Anjali Arora) सध्या भलतीच खूश आहे. अंजलीने नुकतंच दिल्लीत आलिशान घर खरेदी केलं आहे. याची किंमतच ४ कोटी रुपये आहे. अंजलीने गृहप्रवेशाचे आणि पूजेचे फोटो, व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केले आहेत. वयाच्या केवळ २२ व्या वर्षी अंजलीने स्वत:चं घर खरेदी केल्याने तिच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होतोय. 
 
कंगना रणौतच्या 'लॉकअप' या रिएलिटी शोमधून अंजली अरोरा प्रसिद्धीझोतात आली होती. दरम्यान तिचा एक MMS व्हिडिओही लीक झाला होता. तेव्हा ती चांगलीच चर्चेत होती. तो व्हिडिओ खोटा असल्याचं नंतर तिने स्पष्टीकरण दिलं होतं मात्र तोवर व्हिडिओही खूपच व्हायरल झाला होता. काही दिवसांपूर्वीच अंजली चारधाम यात्रेवरुन परत आली आहे. २०२३ हे वर्ष तिच्यासाठी खास ठरलं आहे. तिचे अनेक म्यूझिक व्हिडिओ आणि प्रोजेक्ट्स आले. तिने तिच्या आईवडिलांसाठी नवी कारही गिफ्ट केली. तर आता स्वत:साठी तिने आलिशान घर घेतलं आहे. माध्यम रिपोर्टनुसार, तिची एकूण नेटवर्थ सुमारे ८ कोटी असल्याचा अंदाज आहे.

अंजलीचा सोशल मीडियावर मोठा चाहतावर्ग आहे. तिचे १३ मिलियन फॉलोअर्स आहेत. अंजलीने इतकं महागडं घर कसं काय घेतलं? तिच्याकडे इतके पैसे आले कुठून? अशा कमेंट्सही तिच्या पोस्टवर आल्या आहेत. नेटकऱ्यांनी तिला ट्रोल केले आहे. 'कच्चा बदाम' हे तिचं गाणंही व्हायरल झालं होतं.  

Web Title: social media influencer Anjali Arora bought new house in delhi worth 4 cr

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.