भरस्टेजवर अरुण कदम यांना पाहताच गौतमीने केलं असं काही की नेटकऱ्यांकडून कौतुकाचा वर्षाव, व्हिडीओ व्हायरल
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 12, 2024 15:46 IST2024-10-12T15:43:17+5:302024-10-12T15:46:57+5:30
भर कार्यक्रमात 'महाराष्ट्रातील हास्यजत्रा' फेम अरुण कदम यांना पाहताच गौतमीने केलेल्या कृतीचं होतंय नेटकरी कौतुक करत आहेत.

भरस्टेजवर अरुण कदम यांना पाहताच गौतमीने केलं असं काही की नेटकऱ्यांकडून कौतुकाचा वर्षाव, व्हिडीओ व्हायरल
Gautami Patil Video : सोशल मीडियास्टार, लावणी डान्सर अशी गौतमी पाटीलची ओळख आहे. आपल्या नृत्यकौशल्याच्या जोरावर गौतमी आज तरुणाईच्या गळ्यातील ताईत बनली आहे.सध्या तरुण वर्गामध्ये गौतमी पाटील या नावाची मोठी क्रेझ पाहायला मिळते. तिची एक झलक पाहण्यासाठी चाहते प्रचंड आतुर असतात.परंतु, अनेकदा गौतमीला तिच्या नृत्यामुळे ट्रोल केलं जातं. दरम्यान, सोशल मीडियावर अभिनेत्री गौतमी पाटीलचा येवल्यातील एका कार्यक्रमाचा व्हिडीओ समोर आला आहे. हा व्हिडीओ पाहून गौतमीचे चाहते तिच्या संस्कारांचं कौतुक करत आहेत.
अलिकडेच 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम अभिनेते अरुण कदम यांनी येवल्यात एका कार्यक्रमामध्ये हजेरी लावली. या कार्यक्रमासाठी त्यांना आमंत्रित करण्यात आलं होतं. त्याठिकाणी गौतमी पाटील देखील उपस्थित होती. याचा व्हिडीओ तिने इन्स्टाग्राम अकाउंटवर शेअर केल्याचा पाहायला मिळतोय.या व्हिडीओवर स्टेजवर अरुण कदम यांना पाहताच गौतमी त्यांच्या पाया पडते. त्यांचा आदरयुक्त सन्मान करते. गौतमीचं हे कृत्य पाहून चाहत्यांनी तिच्यावर स्तुतीसुमने उधळली आहेत.
दरम्यान, व्हिडीओमध्ये या कार्यक्रमात गेल्यानंतर विनोदवीर अरूण कदम गौतमीसोबत सेल्फी घेण्यासाठी खिशातून फोन बाहेर काढतात. त्यावेळी गौतमी अगदी आदराने त्यांच्या हातातून फोन घेते आणि सेल्फी काढते. गौतमी पाटीलने तिच्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाउंटवरून हा व्हिडीओ पोस्ट केला आहे. सोबतच 'कॉमेडी किंग, लाडका दादुस' असं कॅप्शन तिने या व्हिडीओला दिलंय.