टीआरपीसाठी गरिबीची थट्टा? संतप्त नेटकर्यांनी घेतला नेहा कक्करचा क्लास
By ऑनलाइन लोकमत | Published: February 23, 2021 03:22 PM2021-02-23T15:22:12+5:302021-02-23T15:22:59+5:30
Indian Idol : नेहा कक्करने संतोष आनंद यांना 5 लाख रूपयांची मदत केली. पण नेहाची ही ‘ऑन कॅमेरा’ मदत अनेकांना रूचली नाही.
एक प्यार का नगमा है..., जिंदगी की ना टूटे लडी... असे सदाबहार गाणी लिहिणारे सुप्रसिद्ध गीतकार संतोष आनंद नुकतेच ‘इंडियन आयडल’मध्ये दिसले. यावेळी संतोष आनंद यांना पाहून केवळ ‘इंडियन आयडल’च्या सेटवरचेच नाही तर त्यांना टीव्हीवर पाहणारे प्रेक्षकही भावूक झालेत. ‘इंडियन आयडल’ची जज नेहा कक्कर तर ढसाढसा रडली. यादरम्यान तिने संतोष आनंद यांना 5 लाख रूपयांची मदत केली. पण नेहाची ही ‘ऑन कॅमेरा’ मदत अनेकांना रूचली नाही. लोकांनी यावरून नेहालाच नाही तर ‘इंडियन आयडल’च्या मेकर्सलाही जबरदस्त ट्रोल केले. टीआरपीसाठी तुम्ही आणखी किती खालची पातळी गाठणार? असा संतप्त सवाल युजर्सनी केला.
‘इंडियन आयडल 12’च्या सेटवर आलेल्या संतोष आनंद यांनी त्यांची सध्याची परिस्थिती आणि मुलगा व सुनेबद्दल सांगितले. त्यांनी सांगितेली कर्मकहाणी ऐकून प्रत्येकाचे डोळे पाणावले. यादरम्यान नेहा कक्करने संतोष आनंद यांना 5 लाख रूपयांची मदत देऊ केली. तुमची नात समजून हे पैसे घ्या, असे नेहा संतोष आनंद यांना म्हणाली. पण नेटकर्यांना कदाचित हे रूचले नाही. टीआरपीसाठी मेकर्सनी गरिबीची थट्टा केल्याचा आरोप अनेक नेटक-यांनी केला.
शर्म आती है जब मीडिया ख़बर बेंचने के लिए इतना गिर जाता है! एक लेखक के स्वाभिमान की धज्जियाँ उड़ा के रख दीं. #SantoshAnand जी एक अच्छी, सुखी और सार्थक ज़िंदगी जी रहे हैं. कभी मिलो उनसे, उनकी ख़ुद्दारी का क़द बड़े-बड़ों को बौना करने के लिए काफ़ी है. SHAME. pic.twitter.com/8gYT5ASins
— Manoj Muntashir (@manojmuntashir) February 22, 2021
यादरम्यान काही लोकांनी यावर उलटसुलट चर्चा सुरु केल्या. भीक मागून संतोष आनंद दिवस ढकलत असल्याच्या बातम्याही उमटल्या. या खोट्या बातम्यांवर गीतकार मनोज मुंतशीर यांनी संताप व्यक्त केला. मीडिया बातमी विकण्यासाठी इतकी नीच पातळी गाठतो, हे पाहून लाज वाटते, असे ट्विट त्यांनी केले. मात्र त्यांच्या या ट्विटनंतर अनेक युजर्सनी नेहा व चॅननला ट्रोल करणे सुरु केले.
जब नेहा कक्कड़ जैसे आधे दिमाग वाले एक बड़े शो में इस तरह पैसे बाँटकर बेइज्जत करेंगे तो मीडिया क्या लिखेगी। इस चैनल की नौटंकी का भी बहुत बड़ा रोल है ऐसा लेख लिखने में..उनको ट्रिब्यूट देने के लिए बुलाया था न कि अपनी दरियादिली कैमरे के सामने दिखाने की...
— Aditya shahi (@adityashahi34) February 22, 2021
‘नेहा सारखे अर्ध्या डोक्याची माणसं एका मोठ्या शोमध्ये अशाप्रकारे पैसे वाटणार असेन, तर मीडिया आणखी काय लिहिणार? संतोष आनंद यांच्याबद्दल अशा बातम्या उमटल्या असतील तर यात चॅनलही दोषी आहे. संतोष आनंद यांना ट्रिब्युट देण्यासाठी बोलवले होते, आम्ही किती महान आहोत हे दाखवण्यासाठी नाही,’ असे आदित्य शाही नावाच्या एका युजरने लिहिले.
मदद off camera करनी चाहिए थी। सेट पर बुलाकर नहीं। हालांकि मैंने शो नहीं देखा। लेकिन ये तो तय है कि उनको पहले हो मालूम होगा संतोष आनंद जी के बारे में। उनको शो पर आने की फीस बिना बताए ज्यादा दी जा सकती थी। व्यक्तिगत मिलकर पोती बनकर मदद की जा सकती थी। शो पर नहीं।
— Medharthi Sharma (@MedharthiS) February 22, 2021
अन्य एका युजरनेही नेहाला ट्रोल केले. मदत ऑफ कॅमेरा करायला हवी होती. सेटवर बोलावून नाही. जगासमोर मदत करण्यासाठी नेहा व्यक्तिश: भेटून त्यांना मदत देऊ शकली असती, असे या युजरने लिहिले.