​सोहेल खान करणार छोटे मियाँ या कार्यक्रमाचे परीक्षण

By ऑनलाइन लोकमत | Published: February 3, 2017 11:37 AM2017-02-03T11:37:16+5:302017-02-03T17:07:16+5:30

सोहेल खानने अनेक वर्षांपूर्वी कॉमेडी सर्कस या कार्यक्रमाचे परीक्षण केले होते. या कार्यक्रमाच्या अनेक सिझनमध्ये आपल्याला तो परीक्षकाच्या भूमिकेत ...

Sohail Khan made the test of the program of small minds | ​सोहेल खान करणार छोटे मियाँ या कार्यक्रमाचे परीक्षण

​सोहेल खान करणार छोटे मियाँ या कार्यक्रमाचे परीक्षण

googlenewsNext
हेल खानने अनेक वर्षांपूर्वी कॉमेडी सर्कस या कार्यक्रमाचे परीक्षण केले होते. या कार्यक्रमाच्या अनेक सिझनमध्ये आपल्याला तो परीक्षकाच्या भूमिकेत पाहायला मिळाला होता आणि आता पुन्हा एकदा तो परीक्षकाच्या खुर्चीत बसणार आहे. तो आता छोटे मियाँ या कार्यक्रमात परीक्षकाची भूमिका साकारणार आहे. त्याने कॉमेडी सर्कस या कार्यक्रमात आतापर्यंत अनेक मोठ्या लोकांच्या कॉमेडी अॅक्टवर भाष्य केले आहे. लहान मुलांना जज करण्यासाठी तो सध्या खूप उत्सुक आहे. 
छोटे मियाँ या कार्यक्रमात चार ते चौदा या वयोगटातील मुलांना त्यांचे विनोद कौशल्य सादर करण्याची संधी दिली जाते. सध्या या कार्यक्रमासाठी ऑडिशन्स सुरू असून देशभरातील विविध भागातील मुले आपली कला सादर करत आहेत. या कार्यक्रमात कोणाची निवड केली जावी आणि कोणाची नाही असे परीक्षकांना झाले आहे. 
छोटे मियाण या कार्यक्रमाने अनेक बालकलाकार छोट्या पडद्याला आणि बॉलिवूडला मिळवून दिले आहेत. या कार्यक्रमाच्या एका सिझनची विजेती ठरलेली छोटी गंगूबाई म्हणजेच सलोनी तर प्रेक्षकांची प्रचंड लाडकी आहे. या सिझनद्वारेदेखील अनेक नवीन कलाकार इंडस्ट्रीला मिळणार आहेत यात काहीच शंकाच नाही. 
सोहेलने आतापर्यंत अनेक कॉमेडी चित्रपटांमध्ये काम केले आहे. मैंने प्यार क्यों क्या या चित्रपटात त्याने साकारलेला प्यारे तर प्रेक्षकांना खूप आवडला होता. सोहेलने अनेक कॉमेडी चित्रपटांचे दिग्दर्शनदेखील केले आहे. त्याला कॉमेडीचा चांगली जाण असल्याने या कार्यक्रमासाठी त्याची निवड करण्यात आली आहे. या कार्यक्रमात त्याच्यासोबत अभिनेत्री नेहा धुपियादेखील परीक्षकाच्या खुर्चीत बसणार आहे. 

Web Title: Sohail Khan made the test of the program of small minds

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.