भररस्त्यात चाहत्यांनी अडवला होता अक्षयाचा रस्ता; पाठलाग करुन केलं होतं हैराण
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 7, 2023 18:10 IST2023-08-07T18:07:39+5:302023-08-07T18:10:01+5:30
Akshaya naik: मालिकेच्या सेटवर जात असताना चाहत्यांनी केला होता अक्षयाचा पाठलाग

भररस्त्यात चाहत्यांनी अडवला होता अक्षयाचा रस्ता; पाठलाग करुन केलं होतं हैराण
मराठी कलाविश्वातील लोकप्रिय अभिनेत्री म्हणजे अक्षया नाईक (akshaya naik). 'ये रिश्ता क्या कहलाता हैं', 'सुंदरा मनामध्ये भरली' या गाजलेल्या मालिकांच्या माध्यमातून अक्षया प्रेक्षकांच्या भेटीला आली. 'सुंदरा मनामध्ये भरली' या मालिकेत अक्षयाने लतिका ही भूमिका साकारली आहे. आणि, पाहतापाहता ती तुफान लोकप्रिय झाली. त्यामुळे आज तिचा मोठा चाहतावर्ग असल्याचं पाहायला मिळतो. परंतु, एकदा एका चाहत्याने अक्षयाला अगदी नको करुन सोडलं होतं. त्याने अगदी अक्षयाचा पाठलाग करायला सुरुवात केली होती. अलिकडेच अक्षयाने लोकमत ऑनलाइनला मुलाखत दिली. या मुलाखतीमध्ये तिने याविषयी भाष्य केलं आहे.
अक्षयाचं घर आणि सुंदरा मनामध्ये भरली मालिकेचा सेट यांच्यात थोडं अंतर आहे. त्यामुळे लतिका रिक्षाने सेटवर निघाली होती. मात्र, वाटेत तिला दोन चाहते भेटले आणि त्यांनी तिचा पाठलाग करायला सुरुवात केली.
Exclusive: 'लोक थेट येऊन कंबरेत हात टाकतात'; मराठी अभिनेत्रीला आला चाहत्यांचा विचित्र अनुभव
"माझं घर आणि सेट जरा लांब असल्यामुळे मी रिक्षाने जाते. एकदा मी सेटवर जाण्यासाठी मार्केटमधून बाहेर रिक्षा पकडायला आले. त्यावेळी एका जोडप्याने मला पाहिलं आणि तू लतिकाच आहेस ना? असं त्या बाईने मला विचारलं. त्यावर तिच्याच नवऱ्याने 'अगं हो ही तीच आहे मी रोज पाहतो ना हिला. इथेच या बिल्डिंगमध्ये राहते वाटतं ही' ,असं म्हणाला आणि ते अक्षरश: माझ्या मागे लागले ते मला फॉलो करत होते. पण, यावर मी काहीच बोलू शकत नव्हते. कारण, चाहते हा माझ्या प्रोफेशनचा भाग आहे. मात्र, काही वेळा असे लोक मागे मागे करत घरापर्यंत वगैरे पोहोचायची भीती वाटते, असं अक्षया म्हणाली.
बॉडी शेमिंग करणाऱ्यांना अक्षयाची चपराक; म्हणाली, 'अशा लोकांकडे...'
दरम्यान, या मुलाखतीमध्ये अक्षयाने तिच्या प्रोफेशनल लाइफसोबत पर्सनल आयुष्यातील काही गोष्टीदेखील शेअर केल्या. यात खासकरुन तिचे कुटुंबीय, तिचं लग्न यांसारख्या गोष्टींवर तिने भाष्य करत अनेक गुपितं उघड केली.