काही होर्डिंग्स रात्रीच दिसतात ! 'रात्रीस खेळ चाले ३' मालिकेचे हे एक आगळंवेगळं होर्डिंग तुम्ही पाहिले का?
By ऑनलाइन लोकमत | Published: April 7, 2021 07:08 PM2021-04-07T19:08:57+5:302021-04-07T19:13:36+5:30
Ratris Khel Chale Promotion Hoarding: जशी काही भूत रात्रीच दिसतात तसेच या होर्डिंगवरचे अण्णा नाईक रात्रीच दिसतात असे म्हणत हटके प्रमोन फंडा पाहायला मिळत आहे.
'रात्रीस खेळ चाले' या मालिकेच्या दोन्ही पर्वाला रसिकांची तुफान पसंती मिळाली होती. रसिकांची मालिकेला मिळालेली पसंती पाहून मालिकेचा तीसरा भागही रसिकांच्या भेटीला आणण्यात आला. ‘रात्रीस खेळ चाले ३’ सुरु झाल्यापासून रसिकांमध्ये अधिक उत्सुकता पाहायला मिळत आहे. दिवसेंदिवस मालिकेत वेगवेगळे ट्विस्ट पाहायला मिळत आहे. मात्र रसिक मालिकेत शेवंता आणि अन्ना नाईक या पात्रांना पाहण्यासाठी आतुर झाले आहेत.
सुरुवातीच्या दोन्ही भागात सर्वच कलाकारांनी जीव ओतून आपल्या भूमिका साकारल्या होती, त्यामुळे आजही ही सर्वच पात्रे प्रेक्षकांच्या लक्षात आहेत. मात्र सर्वाधिक लोकप्रियता मिळाली ती अन्ना आणि शेवंता या पात्रांना.मालिकेत माधव अभ्यंकर यांनी साकारलेले खलनायक अण्णा नाईक या पात्राने तर प्रत्येकाच्याच मनात धडकी भरवली होती
v
अपूर्वा नेमळेकर हिने साकारलेल्या शेवंता या पात्रानेही तुफान रसिकांची पसंती मिळवली होती. त्यामुळे मालिकेच्या तिस-या पर्वामध्ये कशी आणि कोणत्या रूपात अन्ना नाईक आणि शेवंता रसिकांच्या भेटीला येतील याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
आता त्याच पाठोपाठ अन्ना नाईकही रसिकांना धडकी भरवण्यासाठी येणार आहेत. सध्या अन्ना नाईक आणि शेवंता यांच्याकडेच सा-यांचे लक्ष लागलेले असताना, मालिकेचे हटके प्रमोशन करत उत्सुकता आणखी वाढवली जात आहे. 'रात्रीस खेळ चाले' या मालिकेच्या प्रोमोशनसाठी एक नवीन आयडीयाची कल्पना लढवली गेली आहे, एक असं होर्डिंग बनवलं गेलं की ते फक्त आणि फक्त रात्रीच दिसेल. जशी काही भूत रात्रीच दिसतात तसेच या होर्डिंगवरचे अण्णा नाईक रात्रीच दिसतात असे म्हणत हटके प्रमोन फंडा पाहायला मिळत आहे.
दोन्ही पर्वाचे दिग्दर्शन राजू सावंत आणि लेखन प्रल्हाद कुडतरकर आणि राजेंद्र घाग यांनी केले होते. तिस-या पर्वासाठी देखील दिग्दर्शक, लेखक यांच्यासह सर्व कलाकारांची तीच टीम कायम ठेवण्यात आली आहे.फक्त मालिकेत अभिनेत्री ऋतुजा धर्माधिकारीने साकारलेली सुसल्याची भूमिका आता अभिनेत्री पौर्णिमा डे साकारत आहे.