​कोई लौट के आया है या मालिकेसाठी पलक मुच्छालने गायले लग जा गले...

By ऑनलाइन लोकमत | Published: February 16, 2017 05:06 AM2017-02-16T05:06:59+5:302017-02-16T10:36:59+5:30

कोई लौट के आया है या मालिकेत सुरभी ज्योती प्रमुख भूमिकेत साकारणार आहे. ही मालिका एका गूढकथेवर आधारित असून ...

Someone has come back for the series; | ​कोई लौट के आया है या मालिकेसाठी पलक मुच्छालने गायले लग जा गले...

​कोई लौट के आया है या मालिकेसाठी पलक मुच्छालने गायले लग जा गले...

googlenewsNext
ई लौट के आया है या मालिकेत सुरभी ज्योती प्रमुख भूमिकेत साकारणार आहे. ही मालिका एका गूढकथेवर आधारित असून या मालिकेत प्रेक्षकांना अनेक रहस्य पाहायला मिळणार आहेत. ही रहस्य काही भागांनंतरच उलगडणार आहेत. सुरभी या मालिकेदेवारे छोट्या पडद्यावर पुनरागमन करत आहे. त्यामुळे या मालिकेसाठी ती सध्या खूपच तयारी करत आहे. या मालिकेतील कथा ही पुनर्जन्मावर आधारित असल्याने तिने काही दिवसांपूर्वी तिच्या पुनर्जन्माविषयी जाणून घेण्यासाठी संमोहनशास्त्राची मदत घेतली होती. या मालिकेतील प्रत्येक बारकावे ती जाणून घेण्याचा प्रयत्न करत आहे. तसेच या मालिकेत शोएब मलिक प्रमुख भूमिका साकारणार असून या मालिकेसाठी त्याने गेल्या काही महिन्यांमध्ये तब्बल 20 किलो वजन कमी केले आहे. या मालिकेत तो सैनिकाच्या भूमिकेत दिसणार आहे. सैनिकाप्रमाणे दिसण्यासाठी तो रोज दोन तास तरी व्यायाम करत आहे. त्याने जिममध्ये अनेक तास घाम गाळून सिक्स पॅक्स अॅब्स बनवले आहेत. या मालिकेसाठी नुकतेच लग जा गले हे गाणे पलक मुच्छालने रेकॉर्ड केले. लग जा गले हे गाणे लता मंगेशकर यांनी गायले असून आज इतक्या वर्षांनंतरही हे गाणे तितकेच प्रसिद्ध आहे. त्यामुळे खरे तर इतके अवघड आणि सुंदर गाणे गाण्यास कोणत्याही नवीन गायिकेने नकार दिला असता. पण पलकचा आपल्या आवाजावर विश्वास असल्याने तिने हे आव्हान स्वीकारले आणि या गाण्याला तिने खूप चांगला न्याय दिला आहे. या मालिकेतील नायक अभिमन्यू आणि नायिका गितांजली यांच्यातील प्रणयभावना दर्शवण्यासाठी हे गाणे मालिकेत वापरले जाणार आहे. या मालिकेच्या कथेनुसार या गाण्याद्वारे मालिकेत आत्म्याचा प्रवेश होणार आहे. गूढ आणि गंभीर वातावरणाला साजेसा पलकचा आवाज असल्याने हे गाणे मालिकेच्या प्रसंगाला अधिक रंजक बनवणार यात काही शंकाच नाही. 

Web Title: Someone has come back for the series;

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.