कुणी तरी येणार येणार गं..! मायरा वायकुळच्या घरी येणार छोटा पाहुणा, पाहा आईचं मॅटर्निटी फोटोशूट
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 9, 2024 16:48 IST2024-04-09T16:47:24+5:302024-04-09T16:48:04+5:30
'माझी तुझी रेशीमगाठ' (Mazi Tuzi Reshimgath) मालिकेतून घराघरात पोहोचलेली बालकलाकार म्हणजे मायरा वायकुळ (Myra Vaikul). दरम्यान आता तिने चाहत्यांना एक खुशखबर दिली आहे.

कुणी तरी येणार येणार गं..! मायरा वायकुळच्या घरी येणार छोटा पाहुणा, पाहा आईचं मॅटर्निटी फोटोशूट
'माझी तुझी रेशीमगाठ' (Mazi Tuzi Reshimgath) मालिकेतून घराघरात पोहोचलेली बालकलाकार म्हणजे मायरा वायकुळ (Myra Vaikul). निरागस अभिनयाने मायराने सगळ्यांची मनं जिंकून घेतली. मालिकेत परीची भूमिका साकारून मायराने रसिकांना लळा लावला होता. त्यामुळेच मालिका संपल्यानंतरही आजही प्रेक्षकांच्या मनात तिचे स्थान कायम आहे. तिचे अनेक व्हिडिओही सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. दरम्यान आता तिने चाहत्यांना एक खुशखबर दिली आहे.
मायरा वायकुळ हिने इंस्टाग्रामवर फोटोशूट शेअर केले आहे. यात तीन फोटो शेअर केले आहेत. ज्यात ती तिच्या आई वडिलांसोबत दिसते आहे. पहिल्या फोटोत तिच्या हातात एक पाटी आहे आणि त्यावर माझ्याकडे एक सीक्रेट आहे, असे लिहिले आहे. तर दुसऱ्या फोटोत तिच्या पाठीमागे तिचे आई वडील दिसत आहेत आणि तिच्या हातात पाटी आहे, ज्यावर मी मोठी बहिण बनणार आहे, असे लिहिले आहे. तिसऱ्या फोटोत तिने त्यांच्या घरी छोट्या पाहुण्याचे आगमन कधी होणार हेदेखील सांगितले आहे. सप्टेंबर, २०२४मध्ये त्यांच्याकडे छोटा पाहुणा येणार आहे.
मायरा लवकरच मोठी ताई होणार आहे. तिचे चाहते खूप खूश झाले आहेत. ते तिच्या या पोस्टवर शुभेच्छांचा वर्षाव होतो आहे. या फोटोशूटमध्ये ती खूपच गोड दिसते आहे. मायरा ट्रेंडिंग गाण्यावरील व्हिडिओ बनवताना दिसून येते. 'माझी तुझी रेशीमगाठ' मालिकेतून प्रसिद्धी मिळवलेल्या मायराचा चाहता वर्गही मोठा आहे. सध्या ती कलर्स वाहिनीवरील 'नीरजा' या मालिकेतून प्रेक्षकांची मने जिंकत आहे.