सोनल वेंगुर्लेकर थोडक्यात बचावली
By ऑनलाइन लोकमत | Published: December 28, 2016 03:03 PM2016-12-28T15:03:28+5:302016-12-28T15:03:28+5:30
ये वादा रहा या मालिकेत प्रमुख भूमिका साकारणाऱ्या सोनल वेंगुर्लेकरचा नुकताच एक अपघात झाला. या अपघातात ती थोडक्यात वाचली. ...
य वादा रहा या मालिकेत प्रमुख भूमिका साकारणाऱ्या सोनल वेंगुर्लेकरचा नुकताच एक अपघात झाला. या अपघातात ती थोडक्यात वाचली. हा अपघात इतका भीषण होता की, या अपघातात तिच्या गाडीचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे.
सोनल ही गणपतीची भक्त आहे. त्यामुळे गणपतीचे दर्शन घेण्यासाठी ती सिद्धीविनायकला गेली होती. पण सिद्धीविनायकवरून परतताना तिच्या गाडीला मोठा अपघात झाला. तिला या अपघातात काहीही दुखापत झाली नसली तरी तिच्या गाडीचे यात नुकसान झाले आहे. या अपघातानंतर सोनल प्रचंड घाबरली होती. याविषयी सोनल सांगते, "मी गणपती बाप्पाचे दर्शन घेण्यासाठी सिद्धीविनायकला गेले होते. दर्शन घेऊन घरी परत जात असताना हायवेला माझ्या गाडीचा अपघात झाला. त्यावेळी मीच गाडी चालवत होते. माझ्या पुढे असणाऱ्या गाडीने अचानक ब्रेक मारला आणि त्यामुळे माझ्या गाडीचादेखील अचानक ब्रेक दाबण्याशिवाय माझ्याकडे काहीच पर्याय नव्हता. मी ब्रेक मारल्यामुळे माझी गाडी पुढच्या गाडीवर जोरदार आदळली. माझी गाडीदेखील वेगात असल्याने गाडी आदळल्यामुळे जोराचा आवाज झाला. त्यामुळे एका क्षणासाठी आपले आता काही खरे नाही असेच मला वाटले होते. पण देवाच्या कृपेने मला साधे खरचटलेदेखील नाही. या अपघातात माझ्या कारचे खूप मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. पुढची बाजू तर पूर्णच खराब झाली आहे. अपघातानंतर मी इतके घाबरले होते की काय करू हेच मला कळत नव्हते. पण मी भाग्यवान असल्याने या अपघातातून वाचले असे मी माझ्या मनाला समजावले.