सोनाली कुलकर्णीच्या हिरकणीमध्ये झळकलेली अभिनेत्री दिसणार 'मुरांबा' मालिकेत, जाणून घ्या तिच्याबद्दल

By ऑनलाइन लोकमत | Published: February 12, 2022 08:00 AM2022-02-12T08:00:00+5:302022-02-12T08:00:07+5:30

सोनाली कुलकर्णीच्या हिरकणी सिनेमातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पत्नीची भूमिका साकारली अभिनेत्री तुम्हाला माहिती?

Sonali Kulkarni's Hirkani starring in 'Muramba' series, find out about her | सोनाली कुलकर्णीच्या हिरकणीमध्ये झळकलेली अभिनेत्री दिसणार 'मुरांबा' मालिकेत, जाणून घ्या तिच्याबद्दल

सोनाली कुलकर्णीच्या हिरकणीमध्ये झळकलेली अभिनेत्री दिसणार 'मुरांबा' मालिकेत, जाणून घ्या तिच्याबद्दल

googlenewsNext

अभिनेत्री सोनाली कुलकर्णी हिचा हिरकणी सिनेमा 24 ऑक्टोबर 2019मध्ये प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. यात सोनालीने हिरकणीची भूमिका साकारली होती, प्रसाद ओकने या सिनेमाचे दिग्दर्शन केलं होतं. सोनाली कुलकर्णीच्या हिरकणी सिनेमातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पत्नीची भूमिका साकारली अभिनेत्री तुम्हाला माहितीय?, लवकरच ती पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. 

स्टार प्रवाहवर सुरु होणाऱ्या 'मुरांबा' या मालिकेतून ती प्रेक्षकांचं मनोरंजन करायला येणार आहे. आम्ही बोलतोय, निशानी बोरुलेबद्दल. निशानीने हिरकणीमध्ये 
छत्रपती शिवाजी महाराजांच्या पत्नीची भूमिका साकारली होती.

लवकरच ती मुरांबा मालिकेत आपल्याला मुख्य भूमिकेत दिसणार आहे. यात ती रमाची भूमिका साकारणार आहे. मुरांबा ही मालिका ट्रायअँगल लव्ह स्टोरी असणार आहे. मालिकेचा नायक म्हणजेच शांशक केतकर रेवाच्या प्रेमात असतो मात्र रेवाची मैत्रीण रमा ही नायकाच्या प्रेमात पडलेली पाहायला मिळते. नायकाच्या आगमनाने रेवा आणि रमा यांच्या मैत्रीत दुरावा निर्माण करणार का हे मालिकेतून प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे.

निशानीबाबत बोलायचे झाले तर तिने याआधी  थंडा बुखार या हिंदी भाषिक म्युझिक व्हिडीओ अल्बममध्ये ती झळकली आहे. एक दाक्षिणात्य जाहिरातीत देखील निशानीने काम केले आहे. या मालिकेआधी अंजन टीव्ही वरील ‘चुलबुली चाची’ या हिंदी मालिकेत तिने महत्वाची भूमिका साकारली होती.​
 

Web Title: Sonali Kulkarni's Hirkani starring in 'Muramba' series, find out about her

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.