‘मरियम खान- रिपोर्टिंग लाइव्ह’मध्ये गाणं ऐकायला मिळणार मासूममधील 'हे' गाणं

By ऑनलाइन लोकमत | Published: May 31, 2018 04:41 AM2018-05-31T04:41:13+5:302018-05-31T10:11:13+5:30

नुकतीच सुरु झालेल्या ‘मरियम खान- रिपोर्टिंग लाइव्ह’ या मालिकेचा वेगळा विषय आणि मन गुंतवून टाकणाऱ्या व्यक्तिरेखांमुळे ही मालिका प्रेक्षकांमध्ये ...

The song 'Hai' will be heard in 'Miriam Khan- Reporting Live' | ‘मरियम खान- रिपोर्टिंग लाइव्ह’मध्ये गाणं ऐकायला मिळणार मासूममधील 'हे' गाणं

‘मरियम खान- रिपोर्टिंग लाइव्ह’मध्ये गाणं ऐकायला मिळणार मासूममधील 'हे' गाणं

googlenewsNext
कतीच सुरु झालेल्या ‘मरियम खान- रिपोर्टिंग लाइव्ह’ या मालिकेचा वेगळा विषय आणि मन गुंतवून टाकणाऱ्या व्यक्तिरेखांमुळे ही मालिका प्रेक्षकांमध्ये अल्पावधीतच लोकप्रिय झाली आहे. मालिकेत मरियमची भूमिका रंगविणाऱ्या देश्ना दुगाड  देश्ना दुगडलाही प्रेक्षकांचा भरघोस प्रतिसाद लाभला आहे.

आता काही दशकांपूर्वी प्रदर्शित झालेल्या मासूम चित्रपटातील ऊर्मिला मातोंडकर आणि जुगल हंसराज या बालकलाकारांनी गायलले ‘लकडी की काठी’ हे गाणे या मालिकेत पुन्हा दाखवले जाणार आहे. मालिकेत मरियमच्या शाळेतील एका कार्यक्रमात मरियम आणि तिच्या तीन मैत्रिणी हे गाणे गाताना दिसतील. यासंदर्भात देश्ना दुगड म्हणाली, “मला या गाण्याची खूप उत्सुकता आहे. आम्ही या गाण्याचे अनेक व्हिडिओ बघितले असून त्याचं चित्रीकरण करताना आम्हाला खूप मजा आली.”

'मरियम खान रिपोर्टिंग लाइव' मालिकाचे कथा भोपाळच्या पार्श्वभूमीवर असणार आहे.या मालिकेपूर्वीही देशना 'इस प्यार को क्या नाम दूं' आणि 'बाल कृष्ण'मालिकेत झळकली होती. सध्या अनेक मालिकेत बच्चेकंपनीचा बोलबाला असल्याचे पाहायला मिळत आहे. अनेकवेळा बच्चेकंपनीला आपण लहान भूमिका करताना पाहिले आहे.मात्र आता तसे नसून बच्चेकंपनी मुख्य भूमिका साकारताना दिसत आहेत. विशेष म्हणजे या मालिकांना रसिकांचीही चांगली पसंती मिळत असल्याचे पाहायला मिळत आहे. विशेष म्हणजे या मालिकांना रसिकांचीही चांगली पसंती मिळत असल्याचे पाहायला मिळत आहे. मरियम खान-रिपोर्टिंग लाइव्ह'ही मालिका रसिकांचे मनं जिंकण्यात यशस्वी ठरेल असा निर्मात्यांना विश्वास आहे. मालिकेतील खालिद सिद्दिकी आणि रुख्सार रेहमान या दिग्गज कलाकारांची मातृभाषा उर्दू असल्याने त्यांनी ती मालिकेतील अन्य कलाकारांना या मालिकेसाठी ही भाषा शिकविण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. मालिकेतील खालिद सिद्दिकी आणि रुख्सार रेहमान हे जुन्या नबाबी घराण्यातील असल्याचे दाखवण्यात आले आहे. त्यामुळे त्यांची मातृभाषा उर्दू दाखविण्यात आली आहे.

Web Title: The song 'Hai' will be heard in 'Miriam Khan- Reporting Live'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.