डिटेक्टिव्ह दीदीसाठी सोनिया बालानीने घेतले स्वसंरक्षणाचे धडे

By ऑनलाइन लोकमत | Published: January 8, 2018 11:06 AM2018-01-08T11:06:25+5:302018-01-08T16:36:25+5:30

दिवसेंदविस महिलांवर होणारे अत्याचा-यांना आळा बसवण्यासाठी डिटेक्टीव्ह दीदी सज्ज झाली आहे.खास महिलांसाठी सुरक्षतेविषयी टिप्स आणि इतकच नाही तर आता ...

Sonia Balani took lessons for self-defense for Detective sister | डिटेक्टिव्ह दीदीसाठी सोनिया बालानीने घेतले स्वसंरक्षणाचे धडे

डिटेक्टिव्ह दीदीसाठी सोनिया बालानीने घेतले स्वसंरक्षणाचे धडे

googlenewsNext
वसेंदविस महिलांवर होणारे अत्याचा-यांना आळा बसवण्यासाठी डिटेक्टीव्ह दीदी सज्ज झाली आहे.खास महिलांसाठी
सुरक्षतेविषयी टिप्स आणि इतकच नाही तर आता त्यांच्या समोर एकच ध्येय असते याची जाणीव डिटेक्टीव्ह दीद छोट्या पडद्या करून देताना दिसणार आहे.  झी टीव्हीवरील वीकेन्ड मालिका डिटेक्टिव्ह दीदी या शो मधील स्त्री खासगी गुप्तहेराला आपल्या शहराला गुन्ह्यांपासून मुक्त करण्याची आकांक्षा असून खासकरून पुरूषांची मक्तेदारी असलेल्या ह्या स्टिरिओटिपीकल प्रोफेशनमध्ये तिला तिचा असा खास ठसाही उमटवायचा आहे.या शोमध्ये डिटेक्टिव्ह दीदी ऊर्फ बंटी शर्माची भूमिका सोनिया बालानी साकारत असून आपल्या व्यक्तिरेखेमध्ये शिरण्यासाठी ती खूप मेहनत घेत आहे. आपला बिनधास्तपणा आणि बारकाईने लक्ष देण्याच्या वैशिष्ट्‌यांमुळे बंटी ह्या शोमध्ये दिल्लीच्या गोटातून सीरियल किलर्स, अव्वल गुन्हेगार आणि गँगस्टर्सशी निगडीत गुन्ह्यांची उकल करत आहे.या व्यक्तिरेखेसाठी सोनियाच्या बाजून पुष्कळ मानसिक आणि शारीरिक परिश्रमांची गरज असून यातील अॅक्शन दृश्ये मास्टर करण्यासाठी खास प्रशिक्षण घेत आहे. तिने आत्मसंरक्षणाचे धडे घ्यायलाही सुरूवात केली असून तञ्ज्ञांच्या मार्गदर्शनाखाली मार्शल आर्ट्‌समध्येही तिला प्रशिक्षण घ्यायचे आहे.आपल्या अनुभवाबद्दल सोनिया म्हणाली, “बंटी ही माझ्या कारकिर्दीमधील सर्वांत कठीण व्यक्तिरेखा आहे.थंडीच्या दिवसांत दिल्लीच्या रस्त्यांवर डिटेक्टिव्ह दीदीसाठी चित्रीकरण करणे आणि मग अॅक्शन दृश्ये साकारणे यांमुळे तब्येतीवरही परिणाम होऊ शकतो. त्यामुळे मला माझा स्टॅमिना वाढवायचा होता आणि ह्या दृश्यामधील सर्व अॅक्शन दृश्ये समाधानकारक पद्धतीने साकारायची होती. म्हणूनच मी आत्मसंरक्षणाचे धडे घ्यायला सुरूवात केली आहे आणि माझा कुठलाही वर्ग चुकू नये याची खबरदारी मी घेते. खरंतर जेव्हा आम्हांला एखादे गहन दृश्य चित्रीत करायचे असते तेव्हा आमच्याकडे सेटवर मार्शल आर्ट्‌स आणि अॅक्शन एक्सपर्ट्‌स असतात आणि त्यांच्याकडूनही मला काहीतरी मार्गदर्शन मिळावे यासाठी मी उत्सुक असतो. मी बंटीच्या व्यक्तिरेखेला न्याय देण्याचा प्रयत्न करत असून मला आशा आहे की आमच्या ह्या प्रयत्नांचे चीज होईल.” असं दिसतंय की सोनिया निश्चितपणे ऑन-स्क्रीन आणि ऑफ-स्क्रीनही काही मस्त पंचेस मारत आहे.



Web Title: Sonia Balani took lessons for self-defense for Detective sister

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.