सोनू सूद पुन्हा एकदा करणार रोडिजच्या नव्या सीझनचं सूत्रसंचालन
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 3, 2023 18:18 IST2023-04-03T18:18:22+5:302023-04-03T18:18:47+5:30
Sonu Sood : सोनू सूद सध्या पंजाबमध्ये त्याची सहकलाकार जॅकलीन फर्नांडिस सोबत फतेहचे शूटिंग करतो आहे. दरम्यान आता त्याने त्याच्या सोशल मीडियावरून रोडीजच्या नवीन सीजनची घोषणा केली आहे.

सोनू सूद पुन्हा एकदा करणार रोडिजच्या नव्या सीझनचं सूत्रसंचालन
सामान्य जनतेला भावणारा अभिनेता आणि सगळ्यांचा लाडका अभिनेता म्हणून सोनू सूद (Sonu Sood) प्रसिद्ध आहे. सोनू सूद सध्या पंजाबमध्ये त्याची सहकलाकार जॅकलीन फर्नांडिस सोबत फतेहचे शूटिंग करतो आहे. दरम्यान आता त्याने त्याच्या सोशल मीडिया वरून रोडीजच्या नवीन सीजन ची खास घोषणा केली आहे.
सोनू सूदने सोशल मीडियावर एमटीव्ही रोडिजच्या नव्या सीझनची घोषणा केली आहे. त्याने पोस्टमध्ये लिहिले की, कोण आहेत हे काही आणखी लोक? तुम्हाला माहित्येय का? ऑडिशनला या तुम्हाला कळेल. तयार व्हा ! #MTVRoadiesAudition कारण आम्ही येतोय लवकरच तुमच्या शहरात !
जो अभिनेता त्याच्या स्टंटच्या बातम्या साठी ओळखला जातो. अमृतसर, पंजाब सारख्या ठिकाणी डोळ्याचे पारणे फेडणारे स्टंट करून त्याने एक वेगळी ओळख निर्माण केली. ज्याने प्रेक्षकांच्या समोर प्रत्यक्षपणे स्टंट केले. फतेहमध्ये सोनू सूद आणि जॅकलीन फर्नांडिस मुख्य भूमिकेत आहेत. या चित्रपटात शिवज्योती राजपूत आणि विजय राज सुद्धा वेगळ्या भूमिकेत आहेत. वर्षाच्या अखेरीस हा चित्रपट येणार आहे.