सोनी बीबीसी अर्थ वाहिनीला झाले एक वर्षं पूर्ण

By ऑनलाइन लोकमत | Published: March 27, 2018 10:27 AM2018-03-27T10:27:25+5:302018-03-27T15:57:25+5:30

ताज्या बीएआरसी आकडेवारीनुसार सोनी बीबीसी अर्थ ही वास्तववादी माहितीवर आधारित मनोरंजन वाहिनी स्थापनेच्या एका वर्षाच्या आतच मेट्रोमधील नंबर १ ...

Sony has completed BBC One Year for a year | सोनी बीबीसी अर्थ वाहिनीला झाले एक वर्षं पूर्ण

सोनी बीबीसी अर्थ वाहिनीला झाले एक वर्षं पूर्ण

googlenewsNext
ज्या बीएआरसी आकडेवारीनुसार सोनी बीबीसी अर्थ ही वास्तववादी माहितीवर आधारित मनोरंजन वाहिनी स्थापनेच्या एका वर्षाच्या आतच मेट्रोमधील नंबर १ ची वाहिनी ठरली आहे. त्यामुळे सोनी बीबीसी अर्थ ही इन्फोटेनमेंट श्रेणीमधील सर्वाधिक वेगाने विकसित होणारी वाहिनी ठरली आहे. एक वर्षापूर्वीच सुरू झालेली ही वाहिनी ६ व्या क्रमांकावर असताना, त्याच्या प्रेक्षकांमध्ये होत असलेली स्थिर वाढ वाहिनीच्या कामगिरीमध्ये स्पष्ट दिसते. बळकट वितरक नेटवर्कच्या पाठींब्यामुळे आणि धोरणात्मक आखणीमुळे तसेच मार्केटिंगच्या नवनवीन कल्पनांमुळे सोनी बीबीसी अर्थ २२ टक्के मार्केट शेअरसह पहिल्या क्रमांकावर आहे. न्यूयॉर्क टाईम्सचे बेस्टसेलर लेखक, प्रसिद्ध टीव्ही प्रेझेंटर आणि वैद्यकीय पत्रकार पुरस्कार विजेते डॉ. मायकल मुस्ली यांच्यासोबत चॅनल आपले हे यश साजरे करत आहे. 
विज्ञानाला जगण्याचा भाग बनवणे ही धारणा बाळगणारे डॉ. मुस्ली हे जन्माने भारतीय असून त्यांची ख्याती आंतरराष्ट्रीय स्तरावर पसरली आहे. आरोग्याशी निगडित प्रश्नांची ठोस उत्तरे मिळवण्यासाठी त्यांनी स्वतः वर अनेकदा प्रयोग करून बघितलेत. आहार, स्वास्थ्य आणि आरोग्यासंबंधित अनेक गैरसमज त्यांनी दूर केले आहेत. 'ट्रस्ट मी आय अॅम अ डॉक्टर', 'मीट द ह्युमन्स', 'द ट्रूथ अबाऊट एक्सरसाइज' हे त्यांचे काही कार्यक्रम आंतरराष्ट्रीय पातळीवर लोकप्रिय ठरलेले असून सोनी बीबीसी अर्थवरही ते दाखवले गेले आहेत.
सुदृढ आणि आरोग्यदायी जीवनतज्ज्ञ शिल्पा शेट्टी हीची उपस्थिती या सेलिब्रेशनचा भाग होती. आपापल्या क्षेत्रात तज्ज्ञ असणारी शिल्पा शेट्टी आणि मायकल यांनी निरोगी आयुष्य जगण्यासाठी मदत करणारे, आरोग्य, स्वास्थ्याविषयी परंपरेने चालत आलेल्या मिथकांचा पर्दाफाश केला. याविषयी शिल्पा शेट्टी सांगते,
“जन्माने भारतीय असलेल्या, आंतरराष्ट्रीय आसामीच्या बरोबरीने आपले विचार व्यक्त करणे हा मी माझा सन्मान समजते. डॉ. मुस्ली यांचे विचार, त्यांचे कार्यक्रम, त्यांचे प्रयोग यामुळे भारतीय पारंपारिक जीवनशैलीची शक्तीस्थाने याबाबत माझ्या धारणा बळकट झाल्या आहेत. इथून पुढे सोनी बीबीसी अर्थवरील त्यांचे कार्यक्रम पाहणे आणि संबधित आवश्यक माहिती मिळवणे याकडे माझा कल राहील.”

Web Title: Sony has completed BBC One Year for a year

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.