Maharashtrachi Hasyajatra : ‘महाराष्ट्रातील हास्यजत्रा’ लवकरच घेणार प्रेक्षकांचा निरोप, पण पुढे ट्विस्ट आहे...!
By ऑनलाइन लोकमत | Published: May 19, 2022 11:14 AM2022-05-19T11:14:50+5:302022-05-19T11:15:44+5:30
Maharashtrachi Hasyajatra: होय, ‘महाराष्ट्रातील हास्यजत्रा’ सध्या सुरू असलेला सीझन लवकरच गाशा गुंडाळणार आहे. खुद्द सोनी मराठीचे कन्टेन्ट हेड अमित फाळके यांनी याबाबतची पोस्ट शेअर केली आहे. पण फार निराश होऊ नका. कारण...
Maharashtrachi Hasyajatra : छोट्या पडद्यावर तुफान लोकप्रिय असलेला कार्यक्रम कोणता? असं विचारल्यावर कुणीही एकच नाव घेईल. ते म्हणजे, ‘महाराष्ट्रातील हास्यजत्रा’ (Maharashtrachi Hasyajatra). विनोदवीरांच्या धम्माल कॉमेडीनं पोटभर हसवणारा हा शो प्रेक्षकांचा आवडता शो आहे. आत्तापर्यंत या शोचे अनेक सीझन येऊन गेलेत. पण आता सर्वांना खळखळून हसवणारा हा शो संपणार आहे. होय, ‘महाराष्ट्रातील हास्यजत्रा’ सध्या सुरू असलेला सीझन लवकरच गाशा गुंडाळणार आहे. खुद्द सोनी मराठीचे कन्टेन्ट हेड अमित फाळके यांनी याबाबतची पोस्ट शेअर केली आहे.
अमित फाळके (Amit Phalke) यांनी त्यांच्या इंस्टाग्रामवर सई ताम्हणकरसोबतचा (Sai Tamhankar) एक फोटो शेअर केला. यात सई आणि अमित दोघांच्याही चेहऱ्यावर सीझन संपणार असल्याचं दु:ख स्पष्ट दिसतंय. सईसोबतचा फोटो शेअर करत हा ‘सीजन रॅप अप सून..’ अशी कॅप्शन त्यांनी या फोटोला दिली आहे.
‘महाराष्ट्रातील हास्यजत्रा’ चा चालू सीझन संपणार म्हटल्यावर चाहते निराश होणं साहजिक आहे. पण फार निराश होऊ नका. कारण पुढे ट्विस्ट आहे...
होय, ‘महाराष्ट्रातील हास्यजत्रा’ चालू सीझन संपणार असला तरी लवकरच या शोचा नवा सीझन येणार आहे. अमित यांनीच प्राजक्ता माळीसोबतचा (Prajakta Mali) आणखी एक फोटो शेअर करत, ही गुडन्यूजही दिली आहे. सईसोबतच्या फोटोला ‘सीझन रॅप अप सून...,’ अशी कॅप्शन त्यांनी दिली. पण यानंतर त्यांनी प्राजक्ता माळीसोबतचा फोटो शेअर केला आहे आणि याला ‘न्यू सीझन सून...,’ अशी कॅप्शन दिली आहे. यात अमित आणि प्राजक्ता दोघांचेही चेहरे आनंदानं टवटवीत झालेले दिसत आहेत.
महाराष्ट्राची हास्यजत्रा हा कार्यक्रम 2018 पासून प्रेक्षकांचं सातत्याने मनोरंजन करत आहे. राजकीय नेत्यांपासून, युट्युब स्टार्स पर्यंत सगळ्याना हास्यजत्रेचं वेड आहे. कठीण काळात सवार्ना हुरूप देणारा हा कार्यक्रम असल्याचं अनेकांचं म्हणणं आहे. या कार्यक्रमात प्रसाद खांडेकर, विशाखा सुभेदार, नम्रता आवटे, समीर चौगुले अशी विनोदाचे षटकार उडवणारी फौज आहे. तर या कार्यक्रमाचं परीक्षण सई ताम्हणकर आणि प्रसाद ओक करतात. प्राजक्ता माळी या कार्यक्रमाची निवेदिका आहे.
महाराष्ट्राची हास्यजत्रा हा केवळ मराठी प्रेक्षकांमध्ये लोकप्रिय नाहीये तर अनेक हिंदी भाषिक प्रेक्षक सुद्धा नेमाने हा कार्यक्रम बघतात. बॉलिवूड ाा कलाकरांनासुद्धा या शोचे चाहते आहेत.