Shocking! डाएट करणं प्रसिद्ध दाक्षिणात्य अभिनेत्याच्या पत्नीला पडलं महागात, ४३व्या वर्षी घेतला जगाचा निरोप

By ऑनलाइन लोकमत | Published: November 1, 2022 05:52 PM2022-11-01T17:52:13+5:302022-11-01T18:15:23+5:30

दक्षिणात्य अभिनेते कल्याण कुमार यांच्यावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे.अभिनेत्याच्या पत्नीचं निधन झालं आहे.

South actor Bharath Kalyans wife Priyadarshini died at the age of 43 with paleo diet | Shocking! डाएट करणं प्रसिद्ध दाक्षिणात्य अभिनेत्याच्या पत्नीला पडलं महागात, ४३व्या वर्षी घेतला जगाचा निरोप

Shocking! डाएट करणं प्रसिद्ध दाक्षिणात्य अभिनेत्याच्या पत्नीला पडलं महागात, ४३व्या वर्षी घेतला जगाचा निरोप

googlenewsNext

बॉलिवूड फिल्म इंडस्ट्री असो की साऊथ इंडस्ट्री, सगळीकडून सतत वाईट बातम्या ऐकायला मिळतात. एकामागून एक मृत्यू होत आहेत. इंडस्ट्रीला कुणाची वाईट नजर लागली माहित नाही. दक्षिणात्य अभिनेते भरत कल्याण  यांच्यावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. अभिनेत्याच्या पत्नीचं निधन झालं आहे. 

भरत कल्याण यांची ४३ वर्षीय पत्नी प्रियदर्शिनी यांचं आज (१ नोव्हेंबर)  निधन झालं आहे. चेन्नई येथील रुग्णालयामध्ये उपचारादरम्यान प्रियदर्शनी यांनी अखेरचा श्वास घेतला. भरत यांच्या पत्नीने पलेओ डाएट करण्यास सुरुवात केली. डाएटमध्ये बदल झाल्यानंतर प्रियदर्शनी यांच्या शरीरावर परिणाम होऊ लागला. बदलतं डाएट हेच प्रियदर्शनी यांच्या आजाराचं मुख्य कारण होतं. गेल्या काही महिन्यांपासून त्यांच्यावर रुग्णालयामध्ये उपचार सुरु होते. उपचारादरम्यान प्रियदर्शनी यांची प्रकृती आणखीनच बिघडत गेली.

तीन महिन्यांपूर्वी त्यांना चेन्नईतील एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले तेव्हा प्रियदर्शिनी यांची प्रकृती चिंताजनक होती. नंतर त्या कोमात गेल्या आणि पुन्हा शुद्धीवर आल्याच नाहीत. भरत कल्याण व प्रियदर्शनी यांना एक मुलगा व मुलगी आहे.प्रियदर्शनी यांच्या निधनामुळे संपूर्ण कुटुंब कोलमडून गेलं आहे. तसेच दाक्षिणात्य कलाक्षेत्रामधील मंडळींनीही प्रियदर्शनी यांना श्रद्धांजली वाहिली आहे.दक्षिणात्य अभिनेते भरत कल्याण दिवंगत प्रसिद्ध कन्नड, तेलुगू, तमिळ अभिनेता कल्याण कुमार यांचा मुलगा आहे.
 

Web Title: South actor Bharath Kalyans wife Priyadarshini died at the age of 43 with paleo diet

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.