साऊथ अभिनेत्रीच्या पतीचं हार्टअटॅकनं निधन; १ वर्षापूर्वी केलं होतं फिटनेस कोचशी लग्न
By ऑनलाइन लोकमत | Published: August 4, 2023 02:00 PM2023-08-04T14:00:40+5:302023-08-04T14:04:07+5:30
माझे तुझ्यावरील प्रेम आणखीनच वाढत आहे आणि आपल्या एकत्र खूप आठवणी आहेत अशी भावूक प्रतिक्रिया तिने पोस्ट केली आहे.
साऊथची सुप्रसिद्ध टीव्ही अभिनेत्री श्रुती शनमुग प्रिया हिच्यावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. श्रुतीचे पती अरविंद शेखर यांचे आकस्मिक निधन झाले आहे. अरविंद यांचं २ ऑगस्टला हृदयविकाराचा झटका आल्याने मृत्यू झाल्याचो सांगण्यात येत आहे. अरविंद शेखर हा ३० वर्षाचा असून तो बॉडीबिल्डर होता. या जोडप्याचे मे २०२२ मध्ये लग्न झाले होते आणि आता अरविंदचा जीवन प्रवास संपला आहे.
मिळालेल्य माहितीनुसार, अरविंद शेखर हे पेशाने फिटनेस कोच होता. अरविंद शेखर याला हृदयविकाराचा झटका आल्यानंतर तात्काळ रुग्णालयात नेण्यात आले. मात्र त्याचा जीव वाचू शकला नाही. अरविंदने गेल्या वर्षी झालेल्या मिस्टर तामिळनाडू २०२२ स्पर्धेचे विजेतेपदही पटकावले होते. या जोडप्याने मे महिन्यात त्यांच्या लग्नाचा पहिला वाढदिवसही साजरा केला. अरविंदच्या इन्स्टाग्राम अकाऊंट पाहिले तर तो इंजिनीअरही होता हे कळते.
अभिनेत्री श्रुतीनं केली भावूक पोस्ट
पतीच्या निधनानंतर श्रुती शनमुग प्रिया हिच्या कुटुंबात शोककळा पसरली आहे. अभिनेत्रीने पतीच्या नावाने एक पोस्ट शेअर केली आहे. अरविंद शेखरसोबतचा आनंदी आणि रोमँटिक फोटो शेअर करत श्रुतीने लिहिले की, 'फक्त तुझं शरीर हे जग सोडून गेले आहे. पण तुझा आत्मा आणि मन माझ्यासोबत आहे आणि आजही मला सुरक्षित ठेवत आहे आणि नेहमीच राहील. तुझ्या आत्म्याला शांती लाभो प्रिय अरविंद शेखर.
त्याने पुढे लिहिलंय की, 'माझे तुझ्यावरील प्रेम आणखीनच वाढत आहे आणि आपल्या एकत्र खूप आठवणी आहेत. मी त्यांना आयुष्यभर जपणार आहे. मला तुझी आठवण येत आहे आणि तुझ्यावर खूप प्रेम आहे अरविंद. तू माझ्यासोबत आहेस असे मला वाटते अशी भावूक प्रतिक्रिया अभिनेत्रीने दिली आहे. श्रुती प्रिया आणि अरविंद शेखर यांचे मे २०२२ मध्ये लग्न झाले. या भव्य लग्नात अभिनेत्री आणि तिच्या पतीच्या कुटुंबासह अनेक पाहुणे पोहोचले होते. आता श्रुतीचं कुटुंब उद्ध्वस्त झाले आहे. पण या कठीण काळातही तिने हिंमत हारलेली नाही. इंडस्ट्रीतील सेलिब्रिटी आणि श्रुतीचे चाहते तिच्या दु:खात तिचे सात्वन करत आहेत.