'आई कुठे काय करते' फेम अनिरुद्ध उर्फ मिलिंद गवळींनी 'कांचन आई'साठी लिहिली स्पेशल पोस्ट

By ऑनलाइन लोकमत | Published: March 14, 2022 12:46 PM2022-03-14T12:46:20+5:302022-03-14T12:46:42+5:30

Aai Kuthe Kay Karte: मिलिंद गवळी (Milind Gawali) यांनी कांचन आईसोबतचे फोटो शेअर करून स्पेशल पोस्ट शेअर केली आहे.

Special post written by Aai Kuthe Kay Karte Fame 'Aniruddha alias Milind Gawali' for 'Kanchan' | 'आई कुठे काय करते' फेम अनिरुद्ध उर्फ मिलिंद गवळींनी 'कांचन आई'साठी लिहिली स्पेशल पोस्ट

'आई कुठे काय करते' फेम अनिरुद्ध उर्फ मिलिंद गवळींनी 'कांचन आई'साठी लिहिली स्पेशल पोस्ट

googlenewsNext


छोट्या पडद्यावरील लोकप्रिय मालिका आई कुठे काय करते(Aai Kuthe Kay Karte)ने कमी कालावधीत रसिकांच्या मनात घर केले आहे. या मालिकेतील सर्वच पात्रांनी रसिकांच्या मनात घर केले आहे. या मालिकेत काम करणारे कलाकारदेखील सेटवर कुटुंबाप्रमाणे वावरत असतात. बऱ्याचदा ते त्यांच्या सहकलाकारांबद्दलचे मत सोशल मीडियावर शेअर करत असतात. दरम्यान या मालिकेत अनिरुद्धची भूमिका अभिनेता मिलिंद गवळी (Milind Gawali) यांनी साकारली आहे. तर त्यांच्या आईची म्हणजेच कांचन ही भूमिका अर्चना पाटकर यांनी साकारली आहे. नुकतीच मिलिंद गवळी यांनी कांचन आईसोबतचे फोटो शेअर करून स्पेशल पोस्ट शेअर केली आहे.

मिलिंद गवळी यांनी इंस्टाग्रामवर अर्चना पाटकर यांच्यासोबतचे फोटो शेअर करून लिहिले की, तुमचे वय कितीबी असो, तुम्हाला नेहमीच आईची गरज असते.
अर्चू ताई, आमच्या सर्वांची लाडकी, आनंदी, आनंदी, फूडी खोडकर, प्रेमळ, काळजी घेणारी, सदैव हसतमुख..ती माझी भाग्यवान आई आहे.


या पोस्टमध्ये पुढे म्हटले की, २००५ साली सून लाडकी सासरची या मराठी चित्रपटात त्यांनी माझ्या आईची भूमिका केली होती. पुन्हा इतक्या वर्षांनंतर २०१९-२०२२ मध्ये ती माझ्या आईची भूमिका साकारतेय "आई कुठे काय करते" मध्ये. हे नियती आहे का?
मिलिंद गवळींच्या या पोस्टला चाहत्यांची खूप पसंती मिळते आहे. एका युजरने म्हटले की, हे माय लेक जबरदस्त, तर दुसऱ्या एका युजरने लिहिले की, आवडते कलाकार. 

Web Title: Special post written by Aai Kuthe Kay Karte Fame 'Aniruddha alias Milind Gawali' for 'Kanchan'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.