स्पृहा जोशीचे आई वडील रुग्णालयात, फोटो शेअर करत म्हणाली, "इतकी माणसं जोडलेली असणं..."
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 15, 2024 15:01 IST2024-10-15T15:00:47+5:302024-10-15T15:01:33+5:30
दोन दिवसांपूर्वीच स्पृहाने आपला वाढदिवस साजरा केला. आज पोस्ट करत म्हणाली...

स्पृहा जोशीचे आई वडील रुग्णालयात, फोटो शेअर करत म्हणाली, "इतकी माणसं जोडलेली असणं..."
अभिनेत्री, कवयित्री स्पृहा जोशीने (Spruha Joshi) दोन दिवसांपूर्वीच वाढदिवस साजरा केला. स्पृहा ३५ वर्षांची झाली. मराठी कलाविश्वातून तिला भरभरुन शुभेच्छा मिळाल्या. आता नुकतंच तिने फोटो पोस्ट करत सर्वांचे आभार मानले. मात्र यासोबत तिने आईवडील रुग्णालयात असल्याची माहिती दिली. त्यांना नक्की काय झालंय हे तिने सांगितलं नसलं तरी त्यांची तब्येत आता सुधारतेय असं ती म्हणाली.
स्पृहाची सोशल मीडियावर पोस्ट
स्पृहाने आधी तिचा एक फोटो शेअर केला. त्यानंतर दुसऱ्या फोटोत तिचे आईबाबा पुण्यातील एका रुग्णालयात असल्याचं दिसत आहे. दोघांनी एकमेकांचा हात हातात घेतला आहे असा तो फोटो आहे. यासोबत स्पृहा लिहिते, "१३ ऑक्टोबरला झालेल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा अजून येतायत.. आई बाबांची तब्येत सुधारतेय...रुग्णालय त्यांची आणि पेशंटच्या नातेवाईकांची प्रेमाने काळजी घेतायत.. सगळे स्नेही, आप्तेष्ट, मित्र “काहीही लागलं तरी सांग” म्हणून दिलासा देतायत.. इतकी माणसं जोडलेली असणं ही त्या दोघांची पुण्याई..
आपल्यावर प्रेम करणारी इतकी माणसं आहेत, ही भावना फार मन भरून टाकणारी आहे. मी तुम्हा सगळ्यांची ऋणी आहे. प्रत्येकाला उत्तर देणं जमलं नाही.. रागावू नका .. लोभ आहेच, तो वाढत राहो ..!!"- स्पृहा
स्पृहाच्या या पोस्टवर चाहत्यांनी कमेंट करत तिला दिलासा दिला आहे. 'आईबाबा लवकर बरे होऊन घरी येतील' अशा कमेंट्स चाहते करत आहेत. तर काहींनी त्यांना नक्की झालं काय असा प्रश्न विचारलाय. यावर स्पृहाने अजून काही माहिती दिलेली नाही.