कसं होतं मालिकेचं शूटिंग? स्पृहा जोशीने दाखवली 'सुख कळले'च्या सेटची झलक

By ऑनलाइन लोकमत | Published: April 3, 2024 10:38 AM2024-04-03T10:38:45+5:302024-04-03T10:41:54+5:30

काही काळ छोट्या पडद्यापासून दूर असलेली स्पृहा नव्या मालिकेतून टीव्हीवर पुनरागमन करत आहे. 'सुख कळले' या मालिकेतून स्पृहा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. 

spruha joshi sukh kalale tv serial shooting started actress shared shoot location video | कसं होतं मालिकेचं शूटिंग? स्पृहा जोशीने दाखवली 'सुख कळले'च्या सेटची झलक

कसं होतं मालिकेचं शूटिंग? स्पृहा जोशीने दाखवली 'सुख कळले'च्या सेटची झलक

मराठी कलाविश्वातील लोकप्रिय असलेली आणि अभिनयाने स्वत:चं वेगळं स्थान निर्माण करणारी अभिनेत्री म्हणजे स्पृहा जोशी. नाटक, मालिका आणि सिनेमांमध्ये तिने काम केलं आहे. 'उंच माझा झोका', 'एका लग्नाची तिसरी गोष्ट', 'लोकमान्य' अशा मालिकांमध्ये काम करून ती टीव्हीवरील लोकप्रिय चेहरा बनली होती. तर सूर नवा ध्यास नवा या शोचं तिने सूत्रसंचालनही केलं होतं. काही काळ छोट्या पडद्यापासून दूर असलेली स्पृहा नव्या मालिकेतून टीव्हीवर पुनरागमन करत आहे. 'सुख कळले' या मालिकेतून स्पृहा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. 

स्पृहाने काही दिवसांपूर्वीच सोशल मीडियावर याबाबत पोस्ट शेअर करत माहिती दिली होती. आता स्पृहाच्या 'सुख कळले' मालिकेच्या शूटिंगला सुरुवात झाली आहे. याचा एक व्हिडिओ तिने इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. या व्हिडिओत सकाळी ७.३० वाजता स्पृहा घरातून शूटिंगसाठी निघाल्याचं दिसत आहे. या व्हिडिओत तिने शूटिंग लोकेशन आणि सेटची झलकही दाखवली आहे. "सुख कळले मालिकेच्या शूटिंगला सुरुवात...माझ्या शूटच्या पहिल्या दिवसाची एक छोटीशी झलक", असं कॅप्शन तिने या पोस्टला दिलं आहे. स्पृहाच्या या पोस्टवर चाहते आणि सेलिब्रिटींनीही कमेंट करत तिला शुभेच्छा दिल्या आहेत. 

'सुख कळले' ही स्पृहाची नवी मालिका कलर्स मराठी वाहिनीवर दाखवली जाणार आहे. या मालिकेत सागर देशमुखही स्पृहाबरोबर मुख्य भूमिका साकारत आहे. 'सोहम प्रोडक्शन' ही आदेश बांदेकरांची प्रोडक्शन कंपनी या मालिकेची निर्मिती करत आहे. २२ एप्रिलपासून ही मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. 
 

Web Title: spruha joshi sukh kalale tv serial shooting started actress shared shoot location video

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.