दलजीत कौरनंतर श्रीजिता डे बांधणार लग्नगाठ, गोव्यात थाटात पार पडणार विवाहसोहळा
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 27, 2023 19:21 IST2023-03-27T17:49:19+5:302023-03-27T19:21:54+5:30
छोट्या पडद्यावर सध्या लग्नाचे वारे वाहता येत. दलजीत कौरनंतर आणखी एक अभिनेत्री लग्नाच्या बेडीत अडकणार आहे.

दलजीत कौरनंतर श्रीजिता डे बांधणार लग्नगाठ, गोव्यात थाटात पार पडणार विवाहसोहळा
Sreejita De Wedding: छोट्या पडद्यावर सध्या लग्नाचे वारे वाहता येत. दलजीत कौरनंतर आणखी एक अभिनेत्री लग्नाच्या बेडीत अडकणार आहे. अभिनेत्री श्रीजीता डे बिग बॉस 16 या रिअॅलिटी शोमध्ये दिसल्यानंतर प्रचंड चर्चेत होती. सध्या तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे ती चर्चेत आहे. नुकतीच तिने तिच्या चाहत्यांना एक आनंदाची बातमी दिली आहे. श्रीजीता तिचा जर्मन बॉयफ्रेंड मायकेल ब्लोहमसोबत लग्नगाठ बांधणार आहे. श्रीजीताने याआधीही तिच्या लग्नाच्या प्लॅनिंगबद्दल सांगितले होते पण आता तिच्या लग्नाची तारीखदेखील समोर आली आहे. इतकंच नाही तर लग्नाच्या आऊट फिटबाबतही त्याने खुलासा केला आहे.
बिग बॉस 16 च्या दरम्यान श्रीजीता डेने तिचा बॉयफ्रेंड मायकल ब्लॉम-पेपशी सगळ्यांची ओळख करून दिली. फॅमिली स्पेशल वीकमध्ये तो श्रीजीताला भेटायलाही आला होता. यानंतर श्रीजीताने सांगितले की, ती लवकरच मायकेलसोबत सात फेरे घेणार आहे. आता तिने एका मुलाखतीत खुलासा केला आहे की ती 1 जुलै रोजी लग्न करणार आहे आणि तिने 3 महिने आधीच लग्नाची सर्व तयारी सुरू केली आहे.
श्रीजीताने सांगितले की तिने तिचा वेडिंग गाऊन फायनल केला आहे आणि तो जवळजवळ तयार आहे. तिला थाटामाटात लग्न करायचे आहे आणि त्यामुळे ती तयारीत कोणतीही कसर सोडणार नाही. दोघांनी गोव्यात लग्न करण्याचा निर्णय घेतला असून बंगाली रितीरिवाजानंतर हे लग्न जर्मन परंपरेने होणार असल्याचे अभिनेत्रीने सांगितले. . लग्नानंतर ती हनीमूनला मालदीवला जाणार असल्याचे अभिनेत्रीने सांगितले.