या कारणामुळे सुमेध मुदगलकरचे शरद मल्होत्राने केले कौतुक
By ऑनलाइन लोकमत | Published: October 4, 2018 04:45 PM2018-10-04T16:45:17+5:302018-10-04T16:48:32+5:30
‘राधाकृष्ण’ मालिकेत कृष्णाची भूमिका अभिनेता सुमेध मुदगलकर साकारत आहे.
‘मुस्कान’ मालिकेच्या कथानकाचा काळ 14 वर्षांनी पुढे नेण्यात आला आणि त्यानंतर मालिकेत शरद मल्होत्राचा प्रवेश होवून आता दोन आठवड्यांपेक्षा अधिक काळ लोटला आहे. रोनकच्या भूमिकेतील शरद मल्होत्राच्या अभिनयाची प्रशंसा होत असताना शरदने मात्र ‘राधाकृष्ण’ मालिकेतील कृष्णाच्या रूपातील अभिनेता सुमेध मुदगलकरची स्तुती केली आहे.
‘राधाकृष्ण’ मालिकेच्या प्रसारणा निमित्त आयोजित केलेल्या एका पार्टीत शरद मल्होत्राने आपणहून सुमेधची भेट घेतली आणि त्याच्या या भूमिकेतील अभिनयाची आणि त्याच्या रंगभूषेची खूप तारिफ केली. कृष्णाच्या भूमिकेत तो दैवी दिसतो आणि त्याच्या डोळ्यात एक आगळीच जादू आहे, असे शरदने त्याला सांगितले. त्याच्या रंगीत कपड्यांचीही शरदने स्तुती केली.
शरद मल्होत्रा म्हणाला, “राधाकृष्ण मालिकेचे प्रोमो आणि पहिले भाग मी पाहिले आहेत. कृष्णाच्या भूमिकेत सुमेध नक्कीच वैशिष्ट्यपूर्ण आणि दैवी दिसतो. त्याच्याशिवाय दुसरा कोणीही अभिनेता ही भूमिका इतक्या सहजतेने आणि सुंदरतेने साकार करू शकला नसता. ‘राधाकृष्ण’च्या यशासाठी मी सुमेध आणि मालिकेच्या संपूर्ण टीमला शुभेच्छा देतो. प्रेक्षकांनी ‘मुस्कान’मधील माझ्या रोनकच्या भूमिकेवर प्रेम केलं असून ते सुमेधच्या कृष्णाच्या भूमिकेवरही ते असाच प्रेमाचा वर्षाव करतील” असा विश्वास शरदने यावेळी व्यक्त केला.
सुरूवातीपासूनच पौराणिक मालिकांना रसिकांचे प्रचंड प्रेम मिळत आले आहे. मालिकेप्रमाणे त्यातील व्यक्तिरेखा रसिकांच्या आजही लक्षात असतात. पौराणिक विषयांवरील मालिका हा टीव्ही मालिकांमधील नवा कल असून त्या प्रेक्षकांमध्ये भरपूर लोकप्रियही होतात. आता ‘स्टार भारत’ वाहिनीवरही भारतीय संस्कृतीतील अजरामर प्रेम कहाणीचे- राधा-कृष्णाच्या प्रेमकथेचे- भव्य सादरीकरण होत आहे. सिद्धार्थ कुमार तिवारी यांची निर्मिती असलेल्या ‘राधा-कृष्ण’ नावाच्या या मालिकेत दिग्गज कलावंतांची मांदियाळी पाहायला मिळत आहे. छोट्या पडद्यावरील राधा कृष्ण पौराणिक मालिकेतील सारेच पात्र रसिकांच्या पसंतीस पात्र ठरले आहे.