Bigg Boss 17 : घरात आला स्टँडअप कॉमेडियन, लॉकअपनंतर 'बिग बॉस १७'च्या ट्रॉफीवर नाव कोरेल मुनव्वर फारुकी?

By ऑनलाइन लोकमत | Published: October 15, 2023 09:42 PM2023-10-15T21:42:21+5:302023-10-15T21:43:19+5:30

स्टँडअप कॉमेडियन मुनव्वर फारुकीने 'बिग बॉस'च्या घरात एन्ट्री घेतली आहे. 

Standup comedian Munawar Faruqui entry in Bigg Boss 17 will he win this show | Bigg Boss 17 : घरात आला स्टँडअप कॉमेडियन, लॉकअपनंतर 'बिग बॉस १७'च्या ट्रॉफीवर नाव कोरेल मुनव्वर फारुकी?

Bigg Boss 17 : घरात आला स्टँडअप कॉमेडियन, लॉकअपनंतर 'बिग बॉस १७'च्या ट्रॉफीवर नाव कोरेल मुनव्वर फारुकी?

छोट्या पडद्यावरील अतिशय वादग्रस्त पण तितक्याच लोकप्रिय असलेल्या 'बिग बॉस हिंदी'च्या नव्या पर्वाला आजपासून सुरुवात झाली आहे. 'बिग बॉस १७'ची गेल्या कित्येक दिवसांपासून प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत होते. आता अखेर हा शो प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. नुकताच 'बिग बॉस १७'चा ग्रँड प्रिमियर पार पडला. या शोमध्ये छोट्या पडद्यावरील अनेक लोकप्रिय कलाकारांनी एन्ट्री घेतली आहे. स्टँडअप कॉमेडियन मुनव्वर फारुकीने 'बिग बॉस'च्या घरात एन्ट्री घेतली आहे. 

लॉकअपनंतर आता मुनव्वर 'बिग बॉस'चं घर गाजवण्यासाठी सज्ज झाला आहे. 'बिग बॉस'च्या घरात एन्ट्री घेणारा मुनव्वर दुसरा स्पर्धक ठरला.  'बिग बॉस'च्या स्टेजवर मुनव्वरने त्याच्या स्टँडअप कॉमेडीने प्रेक्षकांचं मनोरंजन केलं. मुनव्वरने त्याच्या शायरीने  'बिग बॉस'ला चार चांद लावले.  स्टँडअप कॉमेडीने प्रेक्षकांची मनं जिंकणारा मुनव्वर आता  'बिग बॉस'च्या घरात चाहत्यांचं किती मनोरंजन करतो, हे पाहणं औत्सुक्याचं ठरलं आहे.

मुनावर फारुकी हा स्टँड अप कॉमेडियन तसेच रॅपरसुद्धा आहे. मुनव्वर फारुकीचे इन्स्टाग्रामवर 6 मिलियन पेक्षा जास्त फॉलोवर्स आहेत. मुनव्वर फारुकी ‘लॉक अप’(LockUpp)चा पहिला विजेता ठरला. 70 दिवस संघर्ष केल्यानंतर स्टँडअप कॉमेडियन मुनव्वर फारुकी (Munawar Faruqui ) याने ‘लॉकअप’च्या ट्रॉफीवर आपलं नाव कोरलं. ‘लॉकअप’ या शोचा विजेता ठरलेल्या मुनव्वर फारुकी 'बिग बॉस'च्या ट्रॉफीवर नाव कोरणार का? हे पाहावं लागेल.  

Web Title: Standup comedian Munawar Faruqui entry in Bigg Boss 17 will he win this show

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.