'लक्ष्मीच्या पावलांनी' मालिकेतून 'या' अभिनेत्रीने घेतली एक्झिट; आता नैनाच्या भूमिकेत कोण झळकणार?
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 29, 2025 10:37 IST2025-01-29T10:34:06+5:302025-01-29T10:37:27+5:30
सध्या मराठी मालिकांचा प्रेक्षकवर्ग दिवसेंदिवस वाढत चालला आहे.

'लक्ष्मीच्या पावलांनी' मालिकेतून 'या' अभिनेत्रीने घेतली एक्झिट; आता नैनाच्या भूमिकेत कोण झळकणार?
Laxmichya Pavlani: सध्या मराठी मालिकांचा प्रेक्षकवर्ग दिवसेंदिवस वाढत चालला आहे. या मालिका त्यांच्या आवडीचा विषय बनत आहेत. दरम्यान, टीआरपीच्या शर्यतीत टिकून राहण्यासाठी वाहिन्यांकडूनच वेगवेगळे प्रयोग करण्यात येतात. मालिकेत येणारे नवनवीन ट्विस्ट, जुन्या कलाकारांच्या जागी नव्या कलाकारांची एन्ट्री झालेली पाहायला मिळते. अशातच स्टार प्रवाह वाहिनीवरील 'लक्ष्मीच्या पावलांनी' (Laxmichya Pavlani) या मालिकेबद्दल सध्या चर्चा होताना दिसतेय. अभिनेता अक्षर कोठारी आणि ईशा केसकर यांनी मालिकेत मुख्य भूमिका साकारल्या आहेत. कला आणि अद्वैतची यांची जोडी सर्वांच्या पसंतीस उतरल्याचं पाहायला मिळतंय. दरम्यान, अगदी काही दिवसांपूर्वीच मालिकेतून अभिनेता ध्रुव दातारने एक्झिट घेतली होती. त्यानंतर आणखी एका अभिनेत्रीने ही मालिका सोडल्याचं कळतंय.
'लक्ष्मीच्या पावलांनी' मालिकेत राहुल नावाचं खलनायिकी पात्र साकारणाऱ्या ध्रुव दातारने मालिकेत अचानक एक्झिट घेतली. त्यामुळे त्याच्या चाहत्यांना धक्काच बसला. त्यानंतर राहुलची ऑनस्क्रीन पत्नी म्हणजेच नैनाची भूमिका साकारणारी अभिनेत्री अपूर्वा सपकाळनेही सुद्धा मालिकेतून एक्झिट घेतल्याची माहिती समोर येत आहे.
नैनाच्या भूमिकेत दिसणार ही अभिनेत्री-
दरम्यान, 'लक्ष्मीच्या पावलांनी' मालिकेत अपूर्वा सपकाळच्या जागी अभिनेत्री सानिका बनारसवाले पाहायला मिळणार आहे. मालिकेत सानिका आता नैनाच्या भूमिकेत दिसणार आहे. त्यामुळे ही अभिनेत्री प्रेक्षकांचं मनं जिंकण्यात यशस्वी ठरते का? हे पाहणं आता महत्वाचं ठरणार आहे.
सानिका बनारसवालेच्या वर्कफ्रंटबद्दल सांगायचं झालं तर तिने आजवर लोकप्रिय मराठी मालिकांमध्ये काम केलं आहे. 'कलर्स मराठी'वरील ‘स्वामिनी’ मालिकेत ती झळकली आहे. या मालिकेमध्ये तिने साकारलेलं जानकीबाई नावाचं पात्र आजही प्रेक्षकांच्या लक्षात आहे. याशिवाय 'स्वाभिमान' या मालिकेतही तिने काम केलंय.