अखेर माही आणि रमा समोरासमोर येणार; 'मुरांबा' मालिकेत नवा ट्विस्ट, प्रोमो पाहिलात का?

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 26, 2025 18:17 IST2025-03-26T18:13:11+5:302025-03-26T18:17:06+5:30

छोट्या पडद्यावरील 'मुरांबा' ही मालिका प्रेक्षकांची आवडती मालिका आहे.

star pravah muramba serial new twist mahi and rama will come face to face promo viral | अखेर माही आणि रमा समोरासमोर येणार; 'मुरांबा' मालिकेत नवा ट्विस्ट, प्रोमो पाहिलात का?

अखेर माही आणि रमा समोरासमोर येणार; 'मुरांबा' मालिकेत नवा ट्विस्ट, प्रोमो पाहिलात का?

Muramba Serial: छोट्या पडद्यावरील 'मुरांबा' ही मालिका प्रेक्षकांची आवडती मालिका आहे. अभिनेता शशांक केतकर आणि शिवानी मुंढेकर यांची प्रमुख भूमिका असलेली हा मालिका प्रेक्षकांच्या गळ्यातील ताईत बनली आहे. सध्या मालिकेत रमा अपघातातून सावरत असल्याचा सीक्वेंस दाखवण्यात येत आहे. त्यात आता नुकताच सोशल मीडियावर मालिकेचा आगामी प्रोमो शेअर करण्यात आला आहे. हा प्रोमोने प्रेक्षकांचं लक्ष वेधून घेतलं आहे. मालिकेत आता पुढे काय घडणार? हे जाणून घेण्यासाठी त्यांची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.


स्टार प्रवाह वाहिनीच्या सोशल मीडिया अकाउंटवर मुरांबा मालिकेचा नवा प्रोमो पोस्ट करण्यात आला आहे. या व्हायरल प्रोमोमध्ये दाखवण्यात आलंय की, एका अंधार असलेल्या खोलीमध्ये रमाला बांधून ठेवलं आहे. त्यावेळी हतबल झालेली रमा देवाकडे प्रार्थना करते आणि म्हणते, बाप्पा मला यांच्याकडे जायचंय. सगळे मार्ग बंद झालेत आता तुच काय तो मार्ग दाखवं.

यानंतर प्रोमोमध्ये पाहायला मिळतंय, खिडकीतून अचानक कोणीतरी आतमध्ये खोलीत येतं. तोंडाला मास्क लावून येणारी ती व्यक्ती म्हणजे रमासारखी दिसणारी माही आहे.  माही चेहऱ्यावरचा मास्क काढत म्हणते,"जोपर्यंत माही इथे आहे, तोपर्यंत रमाला काही होणार नाही...", तिला पाहून रमाला धक्का बसतो. दरम्यान, हा नवीन प्रोमो पाहून प्रेक्षक सुखावले आहेत. 

दरम्यान, प्रेक्षकांना मालिकेचा हा भाग येत्या शुक्रवार २८ मार्च दु. १:३० वाजता स्टार प्रवाह वर पाहता येणार आहे. 

Web Title: star pravah muramba serial new twist mahi and rama will come face to face promo viral

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.